Tarun Bharat

जामीनानंतर दिशाच्या आईने न्यायालयासह मानले सर्वांचे आभार

बेंगळूर/प्रतिनिधी

दहा दिवसांपेक्षा तीव्र तणाव आणि चिंताग्रस्त वातावरणात राहून पर्यावरण कार्यकर्त्या दिशा रवी यांच्या कुटूंबाने दिशाला जमीन मिळाल्यांनतर न्यायालयाचे आभार मानले आहेत. दरम्यान दिल्ली न्यायालयाने दिशाला जामीन देण्याच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

कोर्टाच्या आदेशाबद्दल आनंद व्यक्त करताना, दिशाची आईने संकटांच्या काळात मुलीच्या बाजूने उभे राहिलेल्या सर्व समर्थकांचे आभार मानले आहेत.

दिशांच्या आई मंजुळाने बेंगळूरमधील अबिगेरे येथे तिच्या घरी पत्रकारांशी संवाद साधला आणि देशाच्या न्यायव्यवस्थेवर असणारा विश्वास अधिक दृढ झाल्याचे म्हंटले. मंजुळा यांनी दिशाला जमीन मिळाल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. मला भारताच्या कायदेशीर व्यवस्थेवर विश्वास आहे. सत्याचाच कायम विजय होतो. दिशाला पाठिंबा दर्शविणार्‍या आणि तिच्यासाठी समर्थनार्थ उभे राहिलेल्या सर्वांचे आभार कसे म्हणायचे ते मला माहित नाही. अशा त्या म्हणाल्या.

दरम्यान दिशांच्या बेंगळूर आगमनाबद्दल अधिक माहिती सामायिक करण्यास कुटुंबाने नकार दिला. दरम्यान, दिशा आणि जामीन अर्जावरील दिल्ली कोर्टाने दिलेल्या निर्णयावरून कार्यकर्ते आणि नागरी हक्क गटाचे स्वयंसेवक खूष आहेत.

Related Stories

सुप्रिम कोर्टाचे कर्नाटक सरकारला जमीन संपादित करण्याचे निर्देश

Archana Banage

कर्नाटक: सोमवारी ६,४९५ नवीन रुग्णांची भर

Archana Banage

कर्नाटकातील हिजाब प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे

Abhijeet Khandekar

पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार होणार विजयी

Amit Kulkarni

बिदरमध्ये‘ अन्नभाग्य’चा 120 टन तांदूळसाठा जप्त

Patil_p

बेंगळूर : शाळा वेळेचे पालन करत नाहीत

Archana Banage