Tarun Bharat

जायचे आहे पंढरपूरला मात्र गाडी पकडली गोव्याची

मुख्यमंत्री ठाकरे मराठा समाजाला उल्लू बनविण्याचे थांबवा, कायदेशीर कृती करा


प्रतिनिधी / कोल्हापूर


मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी टीकास्त्र सोडले आहे. जायचे आहे पंढरपूरला मात्र गाडी पकडली आहे गोव्याची अशा शब्दात, असा टोला चंद्रकांतदादांनी लगावला असून मराठा समाजाला उल्लू बनविण्याचे थांबवा आणि कायदेशीर कृती करा, असे आवाहनही त्यांनी ठाकरे सरकारला केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरविल्यानंतर राज्यभरातील मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्याचबरोबर मराठा संघटनाही आक्रमक होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील मागणी करणारे निवेदन देण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले. या भेटीवर ंभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राज्यपालांना निवेदन देवून ते राष्ट्रपतींना पाठविण्याची विनंती करणे हीच हास्यास्पद कृती आहे. कारण जायचे आहे पंढरपूरला मात्र गाडी पकडली आहे गोव्याची, अशी काहीशी स्थिती ठाकरे सरकारची झाली आहे. राज्यपालांना गेले सहा सात महिने शिव्या देणारे आज त्यांच्याकडे निवेदन देण्यासाठी नम्रपणे गेले. प्रथेप्रमाणे राज्यपाल निवेदन राष्ट्रपतीकडे पाठवतील. पण मराठा आरक्षणासाठी कायदेशीर कृती करण्याऐवजी ठाकरे सरकार मराठा समाजाला उल्लू बनवित आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कायदेशीर कृती करावी लागेल. 102 वी घटना दुरूस्ती मानली तरी राज्य सरकारने राज्य मागास आयोगाची स्थापना करणे गरजेचे आहे.

त्यानंतर या आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवावे लागेल. आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल राज्य मंत्रिमंडळाला सादर करावा लागेल. त्या अहवालाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली पाहिजे. त्यानंतर हा अहवाल राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला पाठवावा लागेल. राष्ट्रपतीकडे हा अहवाल पाठविला जाईल. त्यानंतर त्यांच्या मंजुरीने राज्य सरकारला राज्यात मराठा समाजाला आरक्षण देता येईल. या कायदेशीर बाबींकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. ही बाब गंभीर असून मराठा समाज फसवणूक कदापि सहन करणार नाही, असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

Related Stories

“एकाच आयुष्यात सोंग करायची तरी किती?”; भाजपच्या केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Archana Banage

खाटांगळेत आशा वर्करला ग्रामपंचायत सदस्यासह चौघांकडून मारहाण

Archana Banage

परदेशातून आलेले 40 जण गृहविलीगीकरणात

Patil_p

माझ्या मतदानाचा अधिकार संजय राऊतांना द्या, आमदार भुयारांची खोचक टीका

Archana Banage

वंचित विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती मिळावी

Archana Banage

काँग्रेसच्या ऑफरला उर्मिलाचा नकार : विजय वडेट्टीवार

Tousif Mujawar