Tarun Bharat

जायबंदी क्रिकेटपटूला भेटून जागवल्या जुन्या आठवणी

प्रतिनिधी/ वडूज

खटाव तालुक्यातील अंबवडे येथील जुन्या काळातील क्रिकेटपटू विजय काकडे हे एका अपघातात गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी जायबंदी झाले आहेत. त्यांना राहते घरी भेटून खटाव येथील पत्रकार संजय लालासाहेब देशमुख यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

  पहिल्यांदा श्री.देशमुख यांच्या काकडे यांच्याशी ओळख असण्याचा प्रश्नच नव्हता..पण क्रिकेट ?? हा समान धागा एकत्र आल्याने ओळख झाली..तो एक हरहुन्नरी क्रिकेटपटू होता..तो विकेट कीपर होता..उंची तशी फारशी नव्हतीच..पण अफलातून यष्टिरक्षक होता..जणू काही भिंतच स्टम्पमागे उभी आहे..बाय रण तो कधीच देत नसे..खूपच चपळ होता.. डोळ्याचं पारणं फेडणा-या स्टम्पींग त्याने सहजपणे केल्या होत्या..हो अन् त्याही लेदर बॉलवर खेळत असताना..वेगवान बॉलरला पण तो स्टंप जवळ विकेट कीपींग करत असे..तशी उपयुक्त फलंदाजी पण करायचा..तसा महा बिलींदर..सेवागिरी महाराजांच्या पुसेगाव मध्ये सामने होते..हा पठ्ठय़ा खेळला एका संघाकडून.. अन् दुसरी मॅच वडूजच्या व्ही सी सी संघातून खेळला..पुसेगावकर पण हुशार गडी..विज्याला खेळून दिला..विज्याने 47 मारला..डाव संपला..मग आब्जेक्शन घेतलं..47 धावा वजा केल्या..मग पुसेगावचा संघ आपसूकच  जिंकला.. शिवशक्ती ची टिम असेल.. असा हा आमचा विज्या..

   मायणीतून निघाला होता घरी..सायंकाळची वेळ होती.. घराच्या ओढीनं मोटार सायकल दामटत होता..पण काळ वाट बघत होता..विज्याच्या मनीध्यानी सुद्धा नव्हतं..काळ थेट समोरुन कसाही वेडावाकडा..वेगात आला असता तरी विज्यानं त्याला सहज आपल्या ग्लोज मध्ये घेतला असता..पण दुर्दैवाने ग्लोज हातात नव्हते.. त्यामुळे विजूने आयुष्यातली पहिली बाय रण दिली..धडधडत आलेल्या गाडीनं विजूला जमिनदोस्त केलं..आयुष्याच्या बाऊंड्रीवर जाऊन थांबला..पण बाऊंड्री पार गेला नाही..परत आयुष्याच्या पिचवर खंबीरपणे उभा आहे..

  आपण पाहिलेला सर्वोत्तम यष्टिरक्षक..आज पण सक्षमपणे परिस्थितीवर अवघड क्षणातही  मात करत आहे..आज ठरवून भेट घेतली..फार्म हाऊसवर होता..माझं पुस्तक दिलं..तु लिहलंय..मी हायका यात..म्हणाला..विजू शिवाय क्रिकेट ?? चे पुस्तक पूर्ण होऊ शकतं का.. मैदानावरच्या रांगडा खेळाडू अन् लेखक..खरं वाटलं नाही त्याला..

Related Stories

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स उलटली; १५ जण गंभीर

datta jadhav

कसबा बीडमध्ये सोन्याच्या पावसाची पुनरावृत्ती ; भांगलण करताना महिलेला सापडली सुवर्णमुद्रा

Archana Banage

खाजगी सुत गिरणी संघटना अध्यक्षपदी आमदार संजयमामा शिंदे यांची निवड

Archana Banage

भाजपने ज्या ज्या पक्षांसोबत हातमिळवणी केली, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला : नवाब मलिक

Archana Banage

Satara : पत्रकार संभाजी चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करा

Abhijeet Khandekar

मविआतील १०-१५ आमदार भाजप-शिंदे गटात प्रवेश करणार; बच्चू कडू

Archana Banage