Tarun Bharat

जावलीत चार रुग्णांची भर!

प्रतिनिधी/ मेढा

   जावली तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्ती कोरोनावर मात करून घरी परतत असताना तालुक्यातील बाधीतांचा आकडा काही थांबता थांबेना . शिंदेवाडी , म्हाते खुर्द तर केडंबे या गावात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून तालुक्याचा आकडा 81 वर गेला आहे.

शिंदेवाडी येथीलमृत बाधीत युवकाची पत्नी ही निघाली बाधीत.     

     जावली तालुक्यातील शिंदेवाडी येथील 40 वर्षीय युवक आपल्या पत्नी व मुलासह 12 जून रोजी मुंबईवरून आला होता. ग्रामस्तरीय कमिटीने या कुटुंबाला होम कॉरंटाईन केले होते. परंतु 16 जून रोजी त्याला श्वास घेण्यास त्रास होवु लागल्याने त्याला त्याच्या कुटुंबीयांनी खाजगी गाडीने दवाखान्यात नेले परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृत्यू पश्चात त्याचे घशाचे श्वाबचे रिपोर्ट कोरोना पॉसिटीव्ह आल्याने खळबळ उडाली.

    दरम्यान  प्रशासकीय यंत्रणा  गावात दाखल होवून . जावलीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, मेढय़ाचे सपोनि  निळकंठ राठोड,तालुका आरोग्य अधिकारी भगवान मोहिते, मंडलाधिकारी वेलकर,आदीनी शिंदेवाडीला भेट दिली. व सर्व नागरीकांना खबरदारीच्या सुचना दिल्या.  प्रशासनाने मृत्यू पावलेल्या युवकाची पत्नी आणि मुलाला रायगाव येथील विलगीकरन कक्षात दाखल केले होते   त्यांचे दोघांचे तसेच या कुटुंबाबरोबर मुंबईवरून आलेल्या वाघदरे येथील महिलेचे असे तिघांचे घशाचे स्राव तपासणीसाठी पाठवले आहेत. तर सांगवी येथील गाडीने हे कुटुंब गावाला आले होते. त्या गाडी चालकाचे घशातील स्त्राव  मुंबईत  येथे तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.  तर मृत्यू पावलेल्या युवकाला खाजगी गाडीतून दवाखान्यात नेणाया चौघांना होम कॉरंटाइन केले असून त्यांचे घशाचे स्राव सात दिवसानी तापसणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे संबधीत यंत्रणेने सांगीतले आहे. दरम्यान बाधीत मयत युवकाच्या पत्नीचाही रिपोर्ट ही पॉसिटीव्ह आल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासकिय यंत्रणेने गांव अगोदरच सिल केले आहे.

      दरम्यान जावलीत आजपर्यंत बाधीत रुग्णांचा आकडा 81 पोहोचला असून 7 जणांचा कोरोनांने बळी घेतला आहे.

  म्हाते खुर्द गांव पुन्हा चर्चेत

    या गावातील आर्यन दळवीच्या मृत्यू मुळे चर्चेत असाणारे म्हाते खुर्द गांव पुन्हा कोरोनाने चर्चेत आले आहे. 

      या गावातील 6. जणांच कुटुंब मुंबई वरून शुक्रवार दि. 19 जुन रोजी गांवी आले होते . गांवी येतानाच या सहा पैकी 62 वर्षीय पुरुष व 54 वर्षीय महिलेच्या घशातील स्वॅब शिरवळ चेक नाक्यावर आरोग्य विभागाच्या यंत्रणेने घेतले होते . त्यांचा रिपोर्ट  दि. 20 रोजी रात्री उशीरा  पॉझिटीव्ह आला. आज सकाळीच तहसिलदार शरद पाटील ,  गटविकास अधिकारी सतिश बुध्दे , सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड , आरोग्य अधिकारी डॉ . भगवानराव मोहिते यांनी गांवाला  भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. व खबरदारीच्या सुचना केल्या. बाधीत पती पत्नीला पांचगणी येथील हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले असून कुटूंबातील अन्य चार सदस्यांना रायगांव येथील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे.

      डॉ.आश्विनी कारंडे , आरोग्य सेवक आर .एस यादव, , एस् .वाय . पळप, एन .टी. पवार , वाय . वाय. सावंत आशा सेविका कांचन दळवी , आरोग्य सेविका अरुणा दळवी, ग्रामसेवक श्री. जाधव , सरपंच सौ .विमल दळवी , दक्षता कमिटी यांनी प्रत्येक नागरीकाची आरोग्य तपासणी करून , सर्वांना योग्य ती काळजी घेण्याच्या सुचना केल्या.

केळघर विभागात पुन्हा कोरोनाचा प्रवेश

     वरोशी , आंबेघर , गवडी या गांवानंतर केळघर विभागात कोरोनाने केडंबे गांवात प्रवेश केला असून या गावातील बाहेर गांवावरुन आलेल्या 65 वर्षीय पुरुषाचा ही रात्री उशीरा रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने केडंबे गांवातही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

        रूग्णानी आपले पूर्वीचे तसेच कोणत्याही आजाराची लक्षणे लपवून ठेवू नयेत. वेळीच उपचार घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. अन्यथा हा गाफील पणा आपल्या स्वतःच्या जीवावर बेतू शकतो तसेच यामुळे आपले कुटुंब व परिसरातील लोक अडचणीत येऊ शकतात. तरी यापुढे लोकांनी अधिक सतर्क रहावे असे आवाहन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केले आहे. 

      आतापर्यंत तालुक्यातील एकूण रुग्ण  संख्या 81 झाली असून सात जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.तालुक्यातील लोकांनी घेतलेल्या खबरदारी मुळे स्थानिक जावली तील लोक कोरोना संक्रमना पासून आज पर्यंत सुरक्षित राहिले आहेत.परंतू मेढा , केळघर,कुडाळ येथील बाजारपेठेत  खरेदी साठी होणारी गर्दी , तसेच नागरीक व व्यापारी यांचे मध्ये कोरोना बाबत कोणतेही गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. सोशल डिस्टेन्सींगचा पूर्ण फज्जाच उडाला असून सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के लोक मास्क शिवाय बाजारात फिरत आहेत.

Related Stories

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे शतक

Patil_p

नैराश्येतून नागठाणेत एकाची आत्महत्या

Archana Banage

किरीट सोमय्यांनंतर त्यांच्या मुलालाही उच्च न्यायालयाचा दिलासा

datta jadhav

Satara : राज्यपाल रमेश बैस सातारा दौऱ्यावर; पुस्तकांच्या गाव भिलारला भेट

Abhijeet Khandekar

नांदणीतील ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील दोन नातेवाईक पॉझिटिव्ह

Archana Banage

शहीद सुधीर निकम यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

datta jadhav
error: Content is protected !!