Tarun Bharat

जावली तालुक्यात कोरोनाची अँन्टीजेन टेस्ट सुविधा उपलब्ध

Advertisements

अहवाल मिळणार  अर्ध्या तासात

प्रतिनिधी/ मेढा

 जावली तालुक्यातील कोरोनाचा हाँटस्पाँट बनलेल्या पुनवडी गावातील संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन गतिमान झाले आहे. कोरोना अहवाल तात्काळ उपलब्ध होण्यासाठी आज जावली तालुक्यात सातारा जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या वतीने अँन्टीजेन टेस्ट सुविधा भणंग येथील केंद्रात सुरु करण्यात आली आहे. या टेस्ट किटच्या माध्यमातून केवळ अर्ध्या तासात कोरोना अहवाल मिळत असल्याने तात्काळ उपाययोजना करून संभाव्य संसर्ग टाळणे शक्य होणार आहे.सध्या जावली तालुक्यासाठी दोनशे किट देण्यात आली असून आवश्यकतेनुसार अजून किटची मागणी करण्यात येईल अशी माहिती जावलीचे  तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.

 शनिवारी 115 टेस्ट किट द्वारे पुनवडीतील सहवासित लोकांची टेस्ट करण्यात आली . यामध्ये चार लोकांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. या बाधितांना पुढील उपचारासाठी कोरोना केंद्रात पाठवण्यात आले आहे.  दरम्यान अँन्टीजेन टेस्ट किटद्वारे जर लक्षणे असणाया व संभाव्य संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांचे अहवाल पुणे येथे तपासणी साठी पाठवण्यात येणार आहेत. पुनवडीची लोकसंख्या 591  असून 138 लोक मुंबई हुन आलेले आहेत. रविवारी उर्वरीत सर्वांचे स्वाब तपासणी पूर्ण होऊ शकेल  अशी माहिती जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

 जिह्या बाहेरून येणाया लोकांना अँन्टीजेन टेस्ट सक्तीची आवश्यकता

 सातारा जिह्यात गेल्या दीड महिन्यात कहर केला आहे. कोरोना बाधितांची दररोजची वाढती आकडेवारी पाहता यापुढे जिह्याबाहेरून येणाया लोकांना अँन्टीजेन टेस्ट सक्तीची करणे आवश्यक आहे. ही टेस्ट शासनाने सर्वसामान्य जनतेला सवलतीच्या दरात जिल्हयाच्या प्रवेश द्वारांवर तसेच तालुका पातळीवर उपलब्ध करून दिल्यास कोरोना संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. 

पुनवडीला उपविभागीय अधिकार्यांची भेट

पुनवडीला सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी भेट दिली. कोरोना बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः पुढे येऊन  प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

जावलीतील कसबे बामणोली ला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; ा मिनाज मुल्ला

जावली तालुक्यातील कसबे बामणोली ा पावसेवाडी येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार कसबे बामणोली या गावाला  कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे. 

  बिरामणेवाडी चे कन्टेमेंट झोनचे  निर्बंध शिथिल

जावली तालुक्यातील खर्शी बारामुरे ग्रामपंचायत अंतर्गत बिरामणेवाडी या गावांत कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण आढळल्याने कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतू निर्धारित कालावधीत या गावांत अन्य कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने  जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार या  गावातील कन्टेमेंट झोन चे निर्बंध शिथील करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.  

       मेढा प्रभाग 8, 9 च्या अटी शिथील करा.!

मेढा येथील प्रभाग क्रमांक 9मधील युवक शिरवळ येथे बाधीत झाल्याने प्रभाग क्रमांक 8 व प्रभाग क्रमांक 9 या दोन प्रभागांना कंटेनंटमेंट झोन लागू करण्यात आला आहे. दरम्यान या व्यक्तिच्या निकटवर्तीयांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. प्रभागातील सर्व नागरीक योग्य ती खबरदारी घेत असून कंटेन्टमेंट झोनची अट शिथील कर0यात यावी अशी मागणी नगरसेविका सौ. निलमताई  जवळ यांनी केली आहे.

दरम्यान कास येथील 38 वर्षीय पुरूष 36, 1 3 , 11 , 47 , 18 , 17 वर्षीय महिला, पुनवडी येथील 42 , 56, व9 वर्षीय पुरुष , 22, 5ध्, 30, 31, 15, वर्षीय महिला, कुसुंबी मुरा येथील 32 वर्षीय व्यक्ती अशा सर्वांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर जावलीत हॉटस्पॉट ठरलेल्या पुनवडी येथील शनिवारी रात्री 4 लोकांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने या गांवातील  बाधीतांचा आकडा 117 वर पोहोचला आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात रात्री आठ पर्यंत 208 रुग्णांची भर, ८ मृत्यू

Archana Banage

केंद्राच्या विकासकामांवर महाराष्ट्र सरकार साशंक

Patil_p

दहावी बोर्डाचे फॉर्म 11 जानेवारीपर्यंत भरण्याचे शाळांचे आवाहन

datta jadhav

फुलवाले, गजरा विक्री करणारे आर्थिक संकटात

Archana Banage

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Abhijeet Khandekar

पदभार स्वीकारताच नारायण राणेंची मुख्यमंत्री आणि संजय राऊतांवर टीका

Archana Banage
error: Content is protected !!