Tarun Bharat

जावळीकर अभियंता सचिनच्या प्रतीक्षेत

Advertisements

मेढा / प्रतिनिधी :  

‘तौक्ते’ चक्रीवादळात मुंबईजवळ अरबी समुद्रात बुडालेल्या बार्ज 305 जहाजातून बेपत्ता झालेले गवडी (ता. जावली) गावचे सुपुत्र वरिष्ठ अभियंता सचिन जगन्नाथ पाटणे (वय 39) यांचा अद्याप तपास लागला नाही. त्यांच्या कुटुंबियांसह जावळीकर त्यांच्या परत येण्याची वाट पाहत आहेत.         

सचिन पाटणे हे ओएनजीसीचे कॉन्ट्रक्ट असलेल्या कंपनीत 2015 मध्ये अभियंता पदावर रुजू झाले होते. चक्रीवादळापूर्वी 16 तारखेला रविवारी सचिनचे पत्नी व कुटुंबातील सदस्यांशी रात्री 12 वा फोनवर बोलणे झाले होते. तो त्यांचा अखेरचा संपर्क. सोमवारी सचिनचा फोन लागला नाही आणि मंगळवारी (18 मे) जहाज बुडाल्याची बातमी समजल्याने कुटुंबियांना धक्काच बसला. 

या जहाजावर 261 कर्मचारी होते. त्यामधील 187 जणांची नौदलाने सुखरूप सुटका केली. 37 जणांचा मृत्यू झाला असून, 38 अद्याप बेपत्ता आहेत. नौदलाला आणखी 20 मृतदेह सापडले असून, त्यांची ओळख पटविणे शक्य नसल्याने त्यांची डीएनए चाचणी करून ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Related Stories

शाहूनगरच्या अमराईमध्ये हाणामारी

Patil_p

मत्रेवाडी येथे युवकाचा गळा आवळून खून

Patil_p

कोडोलीत घरफोडी करुन दोन लाखाचा ऐवज लंपास

Amit Kulkarni

सातारा : हिंगणी व बिदाल येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू रिपोर्ट निगेटिव्ह

Archana Banage

विलासकाकांवर दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार

datta jadhav

सातारा जिल्ह्यात 62 जण कोरोनामुक्त दोघांचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!