Tarun Bharat

जावेद अख्तर आणि शबाना आझमी अपघातात जखमी

ऑनलाईन टीम / मुंबई

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी  हे अपघातात जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात दोघांनाही दुखापत झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात  झाला.मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर टाटा सफारी आणि ट्रक यांची धडक झाली. खालापूर हद्दीत हा अपघात झाला. दरम्यान, जखमी झालेल्या शबाना आझमी यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. जावेद अख्तर यांना सुदैवाने फारशी दुखापत झालेली नाही. ते सुखरुप असल्याचं सांगण्यात येत आहे. दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना झाली.

Related Stories

बारावीचा 10, तर दहावीचा 20 जूनला निकाल

datta jadhav

धोकादायक : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 22,818 वर

Tousif Mujawar

संजय राऊत यांची केंद्र सरकारवर व्यंगात्मक टीका

Tousif Mujawar

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर अज्ञातांनी फेकल्या पेट्रोलच्या बाटल्या

Archana Banage

आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

datta jadhav

नारायण राणेंकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन

Archana Banage