Tarun Bharat

जाहिरात फलक शुल्क वसुलीसाठी निविदा मागविण्याच्या हालचाली

प्रतिनिधी / बेळगाव

शहरातील विविध चौक व मुख्य रस्त्यांशेजारी लावण्यात येणाऱया जाहिरात फलकांच्या माध्यमातून मनपाला वर्षाला 40 लाखांहून अधिक महसूल मिळतो. मात्र, जाहिरात फलक शुल्क आकारणीच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नसल्याने मनपाचा कोटीहून अधिक महसूल बुडाला आहे. त्यामुळे पुन्हा निविदा काढण्याचा विचार मनपाने चालविला आहे.

शहर आणि उपनगरात 200 हून अधिक जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. मात्र, प्लास्टिक बंदीच्या नियमावलीमुळे जाहिरात फलक लावण्यावर संक्रांत आली आहे. त्यामुळे मनपाचा कोटीहून अधिक महसूल बुडाला आहे. मात्र, शहरातील विविध फलकांवर बेकायदेशीररीत्या होर्डिंग लावून जाहिरातबाजी करण्यात येत आहे. पण या माध्यमातून मनपाला कोणताच महसूल मिळत नाही. जाहिरात फलक शुल्काच्या माध्यमातून मनपाला यापूर्वी वर्षाला 40 लाखांचा महसूल मिळत होता. जाहिरात फलक मनपासाठी उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे. पण प्लास्टिक बंदीच्या नियमामुळे जाहिरात फलकांच्या माध्यमातून मिळणारे शुल्क बंद झाले आहे. याचा परिणाम मनपाच्या खजिन्यावर झाला आहे. वर्षाला 40 लाखांचा महसूल बंद झाल्याने विकासकामे राबविणे अशक्मय बनले आहे.

प्लास्टिक बंदीच्या नियमावलीनुसार जाहिरात फलक लावण्यासाठी फ्लेक्सचा वापर करू नये, अशी अट घालून निविदा काढण्यात आली होती. प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी फलक लावण्याची सूचना करण्यात आली होती. या अटींची पूर्तता करणे कंत्राटदारांना अशक्मय आहे. वेळोवेळी मनपाकडून जाहिरात फलक हटविण्याची कारवाई राबविण्यात येते. परिणामी जाहिरात शुल्क वसुली कंत्राटदाराचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. मनपाच्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांनी सहभाग दर्शविला नाही. जाहिरात शुल्क वसुलीसाठी निविदा मागविलेल्या दोन्ही वेळी थंडा प्रतिसाद लाभला. त्यामुळे मनपाचा महसूल बुडाला आहे. महसूल वाढीसाठी पुन्हा निविदा मागविण्याचा विचार मनपाने चालविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Stories

अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

tarunbharat

विकेंड कर्फ्यूमुळे सर्वत्र शुकशुकाट

Amit Kulkarni

चाकु हल्ला प्रकरणी युवकाला अटक

Patil_p

निडगुंदी येथील महिलेवर बलात्कार

Patil_p

मुचंडी, ज्योतीनगर येथील दोघे जण तडिपार

Amit Kulkarni

मठ गल्लीतील ड्रेनेज चेंबर बनले धोकादायक

Amit Kulkarni