Tarun Bharat

जाहीर प्रचार संपला, आता ‘अंडर ग्राऊंड’!

आमदार, मंत्री, मुख्यमंत्रीही उतरले प्रचारात : पणजी, सहा पालिकांसाठी उद्या निवडणूक

प्रतिनिधी / पणजी

राज्यातील सहा नगरपालिका, पणजी महानगरपालिका, 20 ग्रामपंचायती व नावेली जिल्हा पंचायत यांच्या निवडणुकाच्या जाहीर प्रचाराची सांगता काल गुरुवारी सायंकाळी पाच वाजता झाली. आता पुढील 48 तास उमेदवार वैयक्तिक प्रचारावर भर देणार आहेत. काही उमेदवारांच्या प्रचारसाठी आमदार, मंत्री, खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही प्रचारात उतरल्याचे दिसून आले.

पणजी मनपासह डिचोली, वाळपई, पेडणे, कुंकळ्ळी, कुडचडे आणि काणकोण या पालिकांची निवडणूक उद्या शनिवारी 20 रोजी होणार आहे. त्याशिवाय अनेक ग्रामपंचायती, नावेली जिल्हा पंचायत आणि सांखळी पालिकेच्या प्रभाग 9 साठी पोटनिवडणूक होणार आहे. या सर्वांचा जाहीर प्रचार काल गुरुवारी संपुष्टात आला.

आमदार, मंत्री अन् मुख्यमंत्रीही प्रचारात

या निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात बरीच रंगत आली. या उमेदवारांना त्या त्या भागातील आमदार, मंत्री यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. काही ठिकाणी स्वतः आमदार किंवा मंत्री उमेदवारांसमवेत प्रचारासाठी फिरतानाही दिसून आले. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही प्रचारात उतरले. बहुतेक उमेदवारांनी कोपरा बैठका व घरोघरी भेटी देण्यावरच भर दिला होता. ही प्रचार रणधुमाळी गुरुवारी सायंकाळी संपुष्टात आली. रविवार दि. 20 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रारंभ होईल. ही प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे.

राज्यातील उर्वरीत पाच पालिकांच्या निवडणुकीची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्यामुळे उद्या होणाऱया निवडणुकांची दि. 22 रोजी ठरविलेली मतमोजणी होणार नाही हे जवळजवळ निश्चित झाले आहे. मडगाव, मुरगाव, सांगे, केपे व म्हापसा या पालिकांची निवडणूक झाल्यानंतर सर्वांचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

निवडणूक आयुक्तपदी डब्ल्यू.व्हि. रमणमूर्ती

निवृत्त माजी आयएएस अधिकारी डब्ल्यू. व्हि. रमणमूर्ती यांची राज्य निवडणूक आयुक्त म्हणून सरकारने नेमणूक केली आहे. आयोगाच्या एकंदरीत कामकाजाचा आढावा घेऊन 5 पालिकांचे निवडणूक वेळापत्रक अभ्यासाअंती जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारने त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. राज्यपालांनी त्यास मान्यता दिल्याचे आदेशात म्हटले आहे. मूर्ती यांनी आयोगाच्या कार्यालयात जाऊन पदाचा ताबा घेतला आणि तत्पूर्वी त्यांनी पदाची शपथही ग्रहण केली. मडगाव, केपे, सांगे, म्हापसा आणि मुरगाव या पाच पालिकांची निवडणूक घेण्याचे काम त्यांना प्रथम करावे लागणार आहे.

त्या पाच पालिकांचे वॉर्ड आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले असून निवडणूक वेळापत्रकाची वाट पाहिली जात आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत पाच पालिकांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याची पूर्तता रमणमूर्ती यांना करावी लागणार आहे.

Related Stories

उद्यापासून पुन्हा ‘टीका उत्सव’

Amit Kulkarni

गणेशपुरी येथे श्री गणेश पुन:प्रतिष्ठापना सोहळ्याला प्रारंभ

Amit Kulkarni

वेरोडा येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरिण देवस्थानचा आज वार्षीक पिंडीकोत्सव

Amit Kulkarni

गोमंतकीयांचा जीव धोक्यात घालून सनबर्न नकोच

Patil_p

लोकसंस्कृतीच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिल्पग्राम

Patil_p

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना काणकोण भाजपतर्फे आदरांजली

Amit Kulkarni
error: Content is protected !!