Tarun Bharat

‘जिओ’चा 7 वा करार; ADIA ने केली 5,683 कोटींची गुंतवणूक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

अबू धाबीच्या ‘मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी’ नंतर अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) ने  जिओत 5683 कोटींची गुंतवणूक केली आहे. या कंपनीचा जिओमध्ये 1.16 टक्के हिस्सा असेल. रिलायन्सने याबाबतची माहिती दिली आहे. 

अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) ही जिओत गुंतवणूक करणारी सातवी कंपनी आहे. यापूर्वी मागील 2 महिन्यात फेसबुक, सिल्वर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक, अमेरिकेन कंपनी ‘KKR’ आणि अबू धाबीच्या मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीने गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांकडून जिओमध्ये आतापर्यंत 97 हजार 855.65 कोटी रूपयांची गुंतवणूक झाली आहे. या गुंतवणुकीसह रिलायन्स इंडस्ट्रिजने जिओमधील 21.06 टक्के हिस्स्याची विक्री केली आहे. 

यापूर्वी  फेसबुकने 43,534 कोटींची गुंतवणूक करत जिओमध्ये 9.9 टक्के भागीदारी निश्चित केली आहे.  सिल्वर लेकने जिओमध्ये 5655 कोटींची गुंतवणूक करत 1.55 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. तर व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सनेही 11,367 कोटी, जनरल अटलांटिकने 6500 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. तर ‘KKR’ ने 11 हजार 367 कोटींची गुंतवणूक केली आहे. मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीने जिओमध्ये 9093.60 कोटींची गुंतवणूक केली आहे.

Related Stories

मिशन 100% ‘विद्युतीकरण’..!

Rohit Salunke

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर रैना म्हणाला…

prashant_c

देशात राहणार केवळ पाच सरकारी बँका

datta jadhav

एकनाथ शिंदेंनी माझा नेहमीचं सन्मानच केला;हसन मुश्रीफांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

Abhijeet Khandekar

महात्मा गांधींच्या पणतूचे कोरोनाने निधन

datta jadhav

नेस्लेने वाढवली महिलांची संख्या

Patil_p