Tarun Bharat

जिजामाता महिला सहकारी बँकेची 48वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

जिजामाता महिला सहकारी बँक लि. बसवाण गल्लीची 48 वी सर्वसाधारणा सभा दि. 27-11-2021 रोजी लोकमान्य रंगमंदिर (रिझ थिएटर), कोनवाळ गल्ली येथे झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा ऍड. अश्विनी गजाननराव बिडीकर तसेच इतर संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. राजमाता जिजामाता व संस्थापक कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या प्रतिमांचे पूजन चेअरपर्सन अश्विनी बिडीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना बँकेने ग्राहकांना प्रामाणिकपणे सेवा पुरविली आहे. त्यामुळे बँकेवर ग्राहकांचा विश्वास वाढत चालला असून बँकेला 63 लाख 11 हजार रुपयांचा नफा सन 2020-21 सालात झाला असल्याची माहिती बँकेच्या चेअरपर्सन ऍड. अश्विनी गजाननराव बिडीकर यांनी दिली.

बँकेकडे एकूण ठेवी 46 कोटी 20 लाख असून कर्ज 31 कोटी 64 लाख वितरित केले आहे. तर गुंतवणूक 28 कोटी 92 लाख इतकी आहे. खेळते भांडवल 65 कोटी 20 लाख रुपये इतके आहे.

याप्रसंगी अहवाल वाचन व्यवस्थापक नितीन आनंदाचे यांनी तर अंदाजपत्रकाचे वाचन ब्रँच मॅनेजर स्नेहल वसुलकर यांनी केले. सूत्रसंचालन असिस्टंट मॅनेजर गजानन पाटील, ईशस्तवन वैष्णवी डोंगरे तर आभार प्रसाद बेडके यांनी मानले. यावेळी बँकेचे सर्व सभासद व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

बैठकीला व्हा. चेअरपर्सन जयश्री वीरसिंग भोसले, संचालिका लिला गोविंद पाटील, लता नारायण खोडेकर, सुचेता बाळासाहेब भोसले, साक्षी स्वप्नील चोळेकर, भाविका जीवन होनगेकर, रेश्मा राहुल जाधव, मंगला पांडुरंग नाईक, भारती संजीव किल्लेकर, श्वेता श्रेयस घाटगे, नंदिता हिराचंद माने, शशिकला गणपतराव काकतकर उपस्थित होत्या.

Related Stories

तालुक्यात घुमला शंभो महादेवाचा गजर!

Amit Kulkarni

मण्णूर रस्ता डांबरीकरण काम अंतिम टप्प्यात

Amit Kulkarni

क्लब रोड जीएसटी भवन जवळील रस्त्यावर खड्डे

Amit Kulkarni

बेंगळूर : कोविड केअर सेंटरमधील सुमारे ६४ टक्के बेड रिक्त

Abhijeet Shinde

बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

Rohan_P

चेकपोस्टना जिल्हाधिकाऱयांची भेट

Amit Kulkarni
error: Content is protected !!