Tarun Bharat

जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ प्रश्नावर शरद पवार म्हणाले, आठवड्यामध्ये कार्यक्रम करू

Advertisements


मुंबई \ ऑनलाईन टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत रविवारी झालेल्या भेटीचा प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे. या भेटीवेळी त्यांच्यात कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना घरे देण्याबाबत झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी दिली आहे. शरद पवार यांच्यासोबतचे काही फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्याशी रविवारी झालेल्या भेटीची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, “काल अचानक साहेबांची भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला… कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झालं. मी उत्तर दिले कि साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग म्हणाले उशीर कशाला.” शरद पवार यांच्या या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी म्हटलं आपल्या तारखेची वाटत पाहतोय. साहेब म्हणाले ठिक आहे. ह्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करूयात. पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत.”


मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात राज्यासह देशभरातून हजारो रुग्ण येतात. त्यांच्यातील अनेकांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागते. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ‘म्हाडा’ने त्यांचे 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

एनसीबीच्या रडावर 50 सेलिब्रेटिज

Patil_p

आई अंबाबाईची दुसऱ्या दिवशी माहेश्वरी रूपात अलंकार पूजा

Abhijeet Shinde

जिल्हय़ात कडक लॉकडाऊनसाठी प्रशासन सज्ज

Patil_p

कोल्हापूर : सुतगिरणी आधिकार्‍याचा अचानक मृत्यू, स्वॅब तपासणीच्या अहवालाची प्रतिक्षा

Abhijeet Shinde

राजकीय पक्षांचे लक्ष्य ‘युथ ते बुथ’ !

Rahul Gadkar

महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.10 %

Rohan_P
error: Content is protected !!