Tarun Bharat

जितेंद्र आव्हाडांनी अण्णा हजारेंना दिल्या हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मुंबई \ ऑनलाईन टीम

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस आहे. अनेक राजकिय नेत्यांनी अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून हटके अंदाजात अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, प्रिय अण्णा….प्रचंड महागाई ,पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव,ढासळती अर्थव्यवस्था, कोरोनामुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, वाढती सामाजिक दरी, चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांच्या बद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता. व जितेंद्र आव्हाड यांनी #HappyBirthdayAnna हा हॅशटॅग देखील वापरला आहे. सोबत अण्णा हजारे यांचा कानाला हात लावलेला एक फोटो देखील शेअर केला आहे.

सध्या जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. सतत सामाजातील विविध प्रश्नांवर आंदोलनाचे ह्त्यार उपसणारे अण्णा हजारे आता गप्प का, असे लक्षात आणून देण्याचे काम जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षरीत्या केले आहे.

Related Stories

‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणांच्या व्हिडिओचा होणार फॉरेन्सिक तपास

datta jadhav

बसस्थानके फुल्ल; महामार्ग ब्लॉक

Patil_p

सीमाप्रश्नी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी हुशारीने महाराष्ट्राची बाजू मांडावी

datta jadhav

वृत्तपत्रांचे वितरण सध्या अत्यावश्यक

tarunbharat

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समीक्षा अहवाल सरकारला सादर

Archana Banage

देशात 25 हजारांहून अधिक चाईल्ड पोर्नोग्राफीची प्रकरणे उघड

prashant_c