Tarun Bharat

जितो लेडिज विंगचा अधिकारग्रहण समारंभ

प्रतिनिधी/ बेळगाव

जितो लेडिज विंगचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त यशोदा वंटगुडी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नूतन अध्यक्षा अरुणा शहा व सेपेटरी शिल्पा हजारे यांना अधिकार बहाल करण्यात आले.

माजी अध्यक्षा भारती हरदी यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा देऊन सूत्रभार सोपविला. किविशा दोशी यांनी वार्षिक अहवाल सादर केला. उपाध्यक्षपदी रुपाली जनाज व किविशा दोशी, सहसचिव रोमा पाटील व रोशनी खोडा, खजिनदार शोभा दोड्डण्णावर, सहखजिनदारपदी रुपाली पत्रावळी यांची नियुक्ती करण्यात आली. या कमिटीमध्ये निर्मला कळेमनी, सुनीता कठारिया, मिनल शहा, शीला शहा, लता परमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी जितो लेडिज विंगचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Related Stories

खानापूर समितीचा जागृती दौरा उद्यापासून

Amit Kulkarni

सराफ कॉलनीतील रस्त्यांची दैनावस्था

Amit Kulkarni

‘घरकुल 2022’ भव्य प्रदर्शन आजपासून

Omkar B

पंचायतराज खात्याच्या अधिकाऱयांची बेळगावला भेट

Amit Kulkarni

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 146 बसेस सेवेत

Patil_p

शंकरगौडा पाटील यांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गेंची भेट

Patil_p