Tarun Bharat

जितो लेडीज विंगतर्फे पाककृती स्पर्धा उत्साहात

प्रतिनिधी /बेळगाव

जितो लेडीज विंगतर्फे ‘जायका किचन क्वीन’ ही पाककृतीची स्पर्धा एनएफसीआय, गोंधळी गल्ली येथे आयोजित करण्यात आली. यावेळी जवळ जवळ 15 स्पर्धकांनी भाग घेवून नवनवीन कल्पना वापरून रवा आणि पनीरच्या चवदार पाककृती करून स्पर्धेत रंगत आणली.

लेडीज विंगच्या अध्यक्षा रुपाली जनाज यांनी स्वागत केले. त्यानंतर जायकाच्या समन्वयक पूनम चिप्रे यांनी स्पर्धा आयोजनाचा हेतू सांगितला. डॉ. रुपा महाजन आणि अर्चना पाटील यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. अंजना बागेवाडी यांनी केले. तर कार्यवाह रुमा पाटील यांनी आभार मानले. यावेळी केकेजी झोनच्या समन्वयिका भारती हर्दी यांनी मार्गदर्शन केले.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शेफ सॅम्युएल व शेफ निरंजन गदे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक यशस्विनी मिर्जी, द्वितीय क्रमांक पद्मजा भेंडीगिरी, तृतीय क्रमांक हर्षिता मेहता यांनी यश संपादन केले.

Related Stories

सावधान.. हलगा गावातील पाणी बनले दूषित!

Amit Kulkarni

फार्मसी विद्यार्थ्याची बेळगावात आत्महत्या

Amit Kulkarni

ब्लॅक फंगसची रुग्णसंख्या चारशेच्या पार

Amit Kulkarni

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Amit Kulkarni

बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे यांची बदली करा

Patil_p

विद्यार्थ्यांनी घेतला चंद्रग्रहणाचा अनुभव

Patil_p