Tarun Bharat

जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करत दिग्विजय झाला ‘असिस्टंट कमांडंट’


कुर्डुवाडी / तरुण भारत संवाद प्रतिनिधी

येथील दिग्विजय संभाजी गोरे यांने जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर युपीएससी परीक्षेत दुसऱ्याच प्रयत्नात देशात १९६ वा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.


दिग्विजय गोरे यांचे वडिल संभाजी गोरे हे निवृत्त प्राध्यापक आहेत तर आई रुक्मीणी या गृहीणी आहेत. दिग्विजय हा लहानपणापासूनच खुप हुशार होता. म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे त्याचे वडिल संभाजी गोरे यांनी दिग्विजयची बौद्धिक क्षमता ओळखून त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी उद्युक्त केले. आज दिग्विजय याने युपीएससी परीक्षेत देशात १९६ वा क्रमांक पटकावून स्वतःचेच नव्हे तर आई-वडिलांचेही स्वप्न साकार केले.


दिग्विजय याचे प्राथमिक शिक्षण रा.ना.सामाणी कोल्हापुर, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण न्यू काॅलेज कोल्हापूर तर बी.ई.मॅकेनिकल के.आय.टी.महाविद्यालय, कोल्हापूर येथे पूर्ण केले. प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण हे कोल्हापूरातच पूर्ण केले. त्यानंतर त्यांने ज्ञान प्रबोधिनी पुणे येथून स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेश घेतला होता. अभ्यासातील सातत्य व आत्मविश्वासाच्या बळावर केवळ दुसऱ्याच प्रयत्नांत त्याची भारतीय सेवेत ‘असिस्टंट कमांडट’ पदी निवड झाल्यानें त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्याच्या या यशामागे त्याचे आई-वडिल, भाऊ, शिक्षकगण व मित्रपरिवाराच्या योग्य मार्गदर्शन असल्याचे यावेळी त्याने सांगितले.

Related Stories

आर्थिक सुधारणेच्या दिशेने मार्गक्रमण करताना मागे वळून पाहणे गरजेचे

prashant_c

माढा तालुक्याच्या चिंतेत भर, ८ रुग्णांची वाढ

Archana Banage

पत्नीसह मेहुणीवर कोयत्याने वार, बार्शीत एकावर गुन्हा दाखल

Archana Banage

निसर्गाकडे आपण कसे पाहतो, त्यावर आपले यश अवलंबून

prashant_c

शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र अकादमी

prashant_c

सोलापूर : सव्वालाख जेष्ठ नागरिकांना मोफत हेल्थ कार्डचे वाटप

Archana Banage