Tarun Bharat

जिम्नॅस्टिक्समध्ये इस्त्रायल प्रथमच सुवर्णविजेते

Advertisements

अर्तेम डोल्गोप्यातची फ्लोअर एक्सरसाईजमध्ये ऐतिहासिक कामगिरी

इस्त्रायलच्या अर्तेम डोल्गोप्यातने पुरुषांच्या गटात फ्लोअर एक्सरसाईजचे सुवर्ण जिंकत कमाल केली. इस्त्रायलसाठी जिम्नॅस्टिक्समधील हे पहिलेच ऑलिम्पिक सुवर्ण ठरले. या इव्हेंटमध्ये स्पेनच्या रेडर्ली झॅपाताने (14.933) रौप्य तर चीनच्या क्झियाव रुओतेंगने (14.766) कांस्यपदकाची कमाई केली. इस्त्रायलच्या एकाही जिम्नॅस्टला यापूर्वी ऑलिम्पिक इतिहासात एकही पदक जिंकता आले नव्हते. त्यामुळे, अर्तेमचे सुवर्ण त्यांच्यासाठी खऱया अर्थाने ऐतिहासिक ठरले आहे.

इस्त्रायलला यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये गॅल फ्रिडमनने सुवर्ण जिंकून दिले होते. मात्र, ते सेलिंग इव्हेंटमधील होते. 2004 ऑलिम्पिकमध्ये त्याने हा पराक्रम गाजवला होता. रविवारी टोकियोमध्ये डोल्गोप्यातने आपला टर्न पूर्ण केला, त्यावेळी पदक जिंकण्यासाठी ते पुरेसे आहे का, याची त्याला खात्रीही नव्हती. काही बाऊन्सी लँडिंग व 0.100 न्यूट्रल डिडक्शनमुळे रिंगबाहेर जावे लागल्याने ही त्याच्यासाठी प्रतिकूल बाब होती. मात्र, निकाल जाहीर झाला आणि त्याने सुवर्ण जिंकल्याचे अधोरेखित झाले.

Related Stories

ऑलिम्पिकसाठी भारताचे 190 सदस्यांचे पथक

Amit Kulkarni

मुश्फिकूर रहिमची विनंती बांगलादेश मंडळाने फेटाळली

Patil_p

जयवर्धने, ब्रिटीन, शॉन पोलॉकचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश

Patil_p

विंडीजचा वनडे, टी-20 संघ जाहीर

Patil_p

पाकचा आज स्कॉटलंडविरुद्ध औपचारिक सामना

Patil_p

जॉफ अलार्डाईस आयसीसीचे नवे सीईओ

Patil_p
error: Content is protected !!