Tarun Bharat

जिल्हय़ात 24 तासांत 34 कोरोना बळी

Advertisements

बळींची संख्या 1200 च्या उंबरठय़ावर, 24 तासांत 625 नवे रूग्ण, 895 रूग्णांना डिसचार्ज
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 38279
आजपर्यत कोरोनामुक्त झालेले रूग्ण ः 26257
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 10827
कोरोनाने आजपर्यत घेतलेले बळी ः 1197

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात शुक्रवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 34 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 197 झाली आहे. सायंकाळपर्यत 625 नवे रूग्ण दिसून आले. त्यामुळे पॉझिटीव्ह रूग्णसंख्या 38 हजार 279 झाली आहे. 895 रूग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 26 हजार 257 झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.

जिल्हय़ात शुक्रवारी सीपीआरसह अन्य केअर सेंटरमध्ये 1 हजार 182 जणांची तपासणी केली. त्यातील 1 हजार 389 जणांचे स्वॅब घेतले, 332 जणांची अँटीजेन टेस्ट केली. सध्या 10 हजार 826 रूग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यत शेंडा पार्क येथील लॅबमधून 1 हजार 223 रिपोर्ट आले. त्यापैकी 994 निगेटिव्ह तर 279 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 329 रिपोर्ट आले. त्यापैकी 269 निगेटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्हय़ात शुक्रवारी कोरोनाने 34 जणांचा मृत्य़ू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये रूई हातकणंगले येथील 57 वर्षीय पुरूष, नंदवाळ करवीर येथील 70 वर्षीय पुरूष, नागाव हातकणंगले येथील 70 वर्षीय महिला, तळाशी राधानगरी येथील 63 वर्षीय पुरूष, कुंभोज हातकणगंले येथील 70 वर्षीय महिला, तुपवडे शाहूवाडी येथील 70 वर्षीय महिला, सावर्डे हातकणंगले येथील 67 वर्षीय महिला, पारगाव हातकणंगले येथील 64 वर्षीय महिला, नेर्ली करवीर येथील 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये जवाहरनगर इचलकरंजी येथील 60 वर्षीय महिला, नदीवेस नाका येथील 52 वर्षीय पुरूष, इस्लामपूर सांगली येथील 84 वर्षीय महिला, तारदाळ हातकणंगले येथील 85 वर्षीय पुरूष, कुंभोज हातकणंगले येथील 52 वर्षीय पुरूष, कबनूर हातकणंगले येथील 55 वर्षीय महिला, शिरढोण शिराळ येथील 66 वर्षीय पुरूष, गोकुळ चौक इचलकरंजी येथील 55 वर्षीय महिला, विक्रमनगर इचलकरंजी येथील 62 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.

शहर, जिल्हय़ातील केअर सेंटर, खासगी हॉस्पिटल्समध्ये विकासवाडी करवीर येथील 56 वर्षीय पुरूष, माळभाग कुरूंदवाड येथील 75 वर्षीय पुरूष, कसबा बावडा येथील 57 वर्षीय पुरूष, कवठेगुलंद शिरोळ येथील 37 वर्षीय पुरूष, कागल येथील 81 वर्षीय पुरूष, कोल्हापुरातील प्रतिभानगर येथील 74 वर्षीय पुरूष, शिवाजी पार्क येथील 78 वर्षैय महिला, वर्षानगर येथील 68 वर्षीय पुरूष, कळंबा करवीर येथील 50 वर्षीय पुरूष, बसरेवाडी भुदरगड येथील 77 वर्षीय पुरूष, गडहिंग्लज येथील 39 वर्षीय पुरूष, उंबर्डे वैभववाडी सिधुंदुर्ग येथील 62 वर्षीय महिला, यड्राव शिरोळ येथील 73 वर्षीय पुरूष, कुंभोज हातकणंगले येथील 55 वर्षीय पुरूष, आणि दौलतवाडी कागल येथील 62 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.

कोरोनाने आजपर्यत 1 हजार 197 जणांचा बळी घेतला आहे. कोरोना बळींमध्ये ग्रामीण भागात 547, नगरपालिका क्षेत्रात 290, महापालिका क्षेत्रात 289 तर अन्य 70 अशा 1197 जणांचा समावेश असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पीपाटील यांनी सांगितले.

जिल्हय़ात 895 जण कोरोनामुक्त झाल्याने आजपर्यत 26 हजार 257 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 10 हजार 826 रूग्ण उपचार घेत आहेत. शहरात गेल्या 24 तासांत 151 नवे रूग्ण दिसून आल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 11 हजार 929 झाली आहे. जिल्हय़ात गेल्या 24 तासांत आजरा 12, भुदरगड 53, चंदगड 25, गडहिंग्लज 21, गगनबावडा 1, हातकणंगले 63, कागल 13, करवीर 70, पन्हाळा 33, राधानगरी 14, शाहूवाडी 17, शिरोळ 13, नगरपालिका क्षेत्रात 44, कोल्हापूर शहर 151 आणि अन्य 95 असे 625 रूग्ण दिसून आले.

Related Stories

कोल्हापूर : आळवे व उत्रे शाळेची विद्युतीकरणासाठी निवड

Abhijeet Shinde

पेठ वडगावच्या महालक्ष्मी जनावर बाजारात साडेपाच कोटींची उलाढाल

Abhijeet Shinde

Kolhapur; ओव्हरटेक करताना ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार ठार

Abhijeet Khandekar

शिरोळमध्ये दोन गटात हाणामारी, चौघे जखमी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सायबर चौकात कोरोना बाधित रुग्ण, पती-पत्नी सीपीआरमध्ये दाखल

Abhijeet Shinde

पेठ वडगाव : आ. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ प्रतिमेस दुग्धाभिषेक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!