Tarun Bharat

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे सोमवारी आंदोलन

प्रतिनिधी/ सातारा

एकीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे.असे असताना मोदी सरकार सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करुन जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे.त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात राज्याचे सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा मंत्री विश्वजित कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निच्चांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही. उलट सलग 21 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढच करत आहे. कोरोनामुळे जगणे मुश्कील झाले असताना ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवार दि. 29 जून रोजी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.तत्पूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काँग्रेस भवनात सकाळी 10 वाजता बैठक असून त्यास कार्यकर्त्यांनी हजर रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही – शरद पवार

Archana Banage

कोल्हापुरातील पूरस्थिती Live Update फक्त एका क्लिकवर : काळम्मावाडीतून १००० क्युसेक विसर्ग सुरु

Archana Banage

पदवी व पदव्युत्तर लॉ प्रवेशात ओबीसींना आरक्षण लागू करण्याची मागणी

datta jadhav

रिक्षावाले, फेरीवाल्यांसाठी महामंडळ स्थापन करणार

datta jadhav

सातारा : होम आयसोलेट ८,७४५ जण बरे

Archana Banage

गोकुळ शिरगावमध्ये सापडला पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage