Tarun Bharat

जिल्हाधिकारी कार्यालय-न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

प्रतिनिधी/ बेळगाव

बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना झाल्यानंतर मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांनी धर्मवीर संभाजी चौक येथे तीव्र आंदोलन छेडले. म. ए. समिती तसेच इतर संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. तो मोर्चा यशस्वी होऊ नये, यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच न्यायालयातही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. एक तणावपूर्ण आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही मोजक्मया कन्नड संघटनांमुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. अशा प्रतिक्रिया यावेळी अनेकजण व्यक्त करत होते. बेळगावमधील कन्नड भाषिक आणि मराठी भाषिक शांततेने राहतात. मात्र, बाहेरून आलेले काहीजण तेढ निर्माण करत आहेत, अशा प्रतिक्रियाही उमटत होत्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात काही मोजक्मया लोकांनाच प्रवेश देण्यात येत होता. दररोज गजबजलेले जिल्हाधिकारी कार्यालय तसेच न्यायालयामध्ये गर्दी कमी असल्याचे दिसून आले. दिवसभरच त्याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Stories

‘ऑपरेशन मदत’तर्फे सेंद्रिय शेतीच्या प्रयोगांतर्गत वनशेतीला गोल्याळीत प्रारंभ

Amit Kulkarni

परतीच्या प्रवासासाठी जादा बस

Amit Kulkarni

मॅन्युअल स्कॅव्हेंजर सर्वेक्षण अहवाल चुकीचा

Omkar B

गृहमंत्री बसवराज बोम्मई बेळगाव दौऱयावर

Patil_p

कालव्यात कार कोसळून दोघांचा मृत्यू

Amit Kulkarni

वेटलिफ्टिंग स्पर्धेत वैभवी, श्वेता यांना रौप्य

Amit Kulkarni