Tarun Bharat

जिल्हाधिकाऱयांकडून चेकपोस्टची पाहणी

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी चेकपोस्ट नाके उभारण्यात आले आहेत. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार यांनी शनिवारी भेट देऊन पाहणी केली. सर्व वाहनांची योग्य प्रकारे तपासणी करा. कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा करू नका, अशी सक्त ताकीद त्यांनी यावेळी तेथील अधिकाऱयांना आणि कर्मचाऱयांना दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराज्यांतून तसेच एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी अवैद्य दारू, पैसा तसेच इतर वस्तुंची वाहतूक होण्याची शक्मयता आहे. तेव्हा त्यादृष्टीने सर्व वाहनांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकाऱयांनी बाची, बेकिनकेरे, राकसकोप, संतिबस्तवाड क्रॉस, देसूर क्रॉस आदी ठिकाणी भेट दिली.

मतदान केंद्रांनाही दिली भेट

मतदान केंद्रांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार यांनी केली आहे. त्या ठिकाणी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रत्येक बुथमध्ये पिण्याचे पाणी, वीज, शौचालय तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकाऱयांना केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांवर लक्ष देऊन त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, असे त्यांनी सांगितले. यावेळी कृषी विभागाचे शिवनगौडा पाटील, तहसीलदार आर. के. कुलकर्णी, बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे साहाय्यक निवडणूक अधिकारी उपस्थित होते. 

Related Stories

सोनगाव कचरा डेपोला आग

Patil_p

महामार्गावर रस्ता ओलांडताना एसटीच्या धडकेत पादचारी ठार

datta jadhav

मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करावयाच्या कामांचा आढावा

Amit Kulkarni

आता शिवभोजन थाळी निःशुल्क उपलब्ध

Patil_p

जिह्यात गणेश विसर्जन शांततेत

Patil_p

सातारा : प्राध्यापकांची एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात

datta jadhav