Tarun Bharat

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लोवले शाळेच्या वादग्रस्त नामफलकावर पडदा

प्रतिनिधी / संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यातील लोवले जि. प. मराठी शाळेच्या प्रवेशद्वाराला खासगी व्यक्तीचे नाव लावल्याने गेली काही दिवस हे प्रकरण चांगलेच तापले असताना तो फलक तात्काळ हटवण्याचे आदेश खुद्द जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शिक्षण विभागाला दिल्याने बुधवारी सांयकाळी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत त्या प्रवेशद्वारावर कापड टाकून झाकण्यात आले.

जि. प.मराठी शाळा लोवले या शाळेच्या प्रवेशद्वाराला माजी सरपंच चंद्रकांत चव्हाण यांनी आपल्या वडिलांचे नाव दिले होते. याप्रकरणी गावातील ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे वेळोवेळी तक्रार करुनही नाव काढण्यास शिक्षण विभाग टाळाटाळ करत होता. या प्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफीयत मांडली असता जिल्हाधिकारी यांनी दुरध्वनी वरुन हे नाव तात्काळ हटवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांना दिले.

यानंतर काल सांयकाळी या नावावर पडदा चिकटवण्यात आला असुन आचार संहीता संपताच हे नाव तत्काळ हटवण्यात यावे असे आदेश दिले आहेत. शिक्षण विभागाला आदेश प्राप्त होताच बुधवार सांयकाळी संगमेश्वर पं. समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर पडदा टाकुन ते वादग्रस्त नाव झाकले. त्या नावावर पडदा पडल्याचे समजताच लोवले ग्रामस्थात समाधान पसरले आहे.

Related Stories

बेंगळूर-मंगळूर महामार्गावर भूस्खलन, वाहतुकीला फटका

Archana Banage

राज्यात सत्तेसाठी नेत्यांचे गळ्यात गळे, कार्यकर्ता मात्र आपापसात भिडे!

Patil_p

राज्य सहकार महामंडळाच्या अध्यक्षपदी देवेगौडा

Amit Kulkarni

बेंगळूर रेल्वे विभागातील ११ रेल्वे स्थानके आता आय.एस.ओ.

Archana Banage

जिह्यात 65 कोरोनाबाधित

Patil_p

शिवसैनिकांनी निलेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला हाणले चप्पल

Archana Banage