Tarun Bharat

जिल्हापरिषद शाळांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 मे पासून : शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांची माहिती

Advertisements

कोल्हापूर /प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत मोफत व दर्जेदार शिक्षण दिले जाते. सध्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातलेले आहे. जिल्हयातील सर्व शाळा बंद आहेत. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून शाळा सुरु होणार आहेत. पण बहुतांशी पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश कोरोनामुळे निश्चित करता आला नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या वतीने अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे संकेत स्थळ सुरु करण्यात आले आहे. तरी कोल्हापूर जिल्हयातील सर्व पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश सदर संकेतस्थळावर व https://forms.gle/maBWELKaDgWaUEit8 मोबाईल लिंकव्दारे निश्चित करावा. सदरचे संकेतस्थळ सोमवारपासून (11 मे ) सुरु होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राहीवाशी परंतू नोकरी व कामानिमित्त परराज्यात व परजिल्ह्यात वास्तव्यास असणारे पालक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाच्या सुरक्षितेच्या कारणास्तव कोल्हापूर जिल्हयात आलेले आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव अद्याप कमी झालेला नाही. परीणामी नियमितपणे शाळा सुरु होण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे कोणत्याही पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासन व जिल्हा परिषद ऑनलाईन अभ्यासक्रम विषयक सोयीसुविधा, ईलर्निंग, टॅब, स्मार्ट टी. व्ही., ऑनलाईन, पाठयपुस्तके, तज्ञशिक्षक, शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शन, क्रिडा प्रशालेत प्रवेश व भौतिक सुविधांनी युक्त असलेल्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबवित आहेत. तसेच सद्यस्थितीत जिल्हयातील सर्व शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच मोबाईल ॲपद्वारे मार्गदर्शन करीत आहेत. तरी संबंधित पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक क्षणाधिकारी आशा उबाळे यांनी केले आहे.

Related Stories

सांगलीत कोरोनाचे तीन बळी, नवे रूग्ण ४८

Archana Banage

सांगरुळ येथील जवान सुभेदार मारुती साळोखे यांचे निधन

Archana Banage

कोल्हापूर : अवनितील १५ मुली कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

मराठ्यांची उद्या एमपीएससीवर धडक

Abhijeet Khandekar

सदर बाजार परिसरात पाण्याचा ठणाणा

Patil_p

कोरोनाचे आणखीन दोन बळी, दिवसभरात 19 रूग्ण वाढले

Archana Banage
error: Content is protected !!