Tarun Bharat

जिल्हाबंदी आदेशाचा भंग करणाऱया तिघांवर गुन्हा

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय जिह्यात प्रवेश करणाया तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी 8.28 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र अण्णासो भोसले (वय 42), सुरेश शिवाजी ढाणे (वय 39), महेंद्र अर्जुन पवार (वय38) सर्व रा. मूळ पाडळी, ता. सातारा सध्या रा. लोणावळा, ता. मावळ,.जि. पुणे या तिघांनी मावळ ते पाडळी असा कोणत्या तरी वाहनाने प्रवास करत सातारा जिल्हय़ात प्रवेश केला.

जिल्हाधिकारी यांचा संचारबंदीचा व जिल्हा बंदीचा आदेश असतानाही त्या आदेशाचा भंग करून सातारा जिह्यात प्रवेश केला. तसेच संयुक्तिक कारण नसतानाही कोणतेही परवानगीची कागदपत्रे जवळ न बाळगता जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचा भंग केल्याने त्यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

आरक्षणासाठी सातारा ते राजभवन पदयात्रा

datta jadhav

उरमोडीत पोहताना एकाचा बुडुन मृत्यू

Patil_p

पत्नीच्या डोक्यात दगड घालत आईलाही मारहाण

Amit Kulkarni

एच. के. पाटील काय म्हणतात त्यालाच आम्ही महत्व देतो; प्रफुल्ल पटेलांचा पटोलेंना टोला

Archana Banage

महाविकास आघाडीचे निर्णय रद्द करणे अव्यवहार्य

Archana Banage

राज-उद्धव एकत्र येणार का ? संजय राऊत म्हणाले…

Tousif Mujawar