Tarun Bharat

जिल्हावासियांची पावसाने उडवली त्रेधा

प्रतिनिधी/ सातारा

सध्या जिह्यात सुगीची कामे सुरु आहेत. खरीप हंगामातील भात आणि भुईंमूग या पिकांची काढणी पश्चिम भागात सुरु आहे. परंतु अवेळी आलेल्या पावसाने ही कामे ठप्प झाली आहेत. पसऱया भुईंमूग उगवण्याची शक्यता तर ज्वारी काळी पडण्याची भिती शेतकऱयांमधून व्यक्त केली जात आहे. सकाळपासून सातारा शहरासह जिह्यात पावसाची रिपरिप सुरु होती. शहराच्या बाजारपेठेत पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत होते. काही सातारकरांनी रविवारी सुट्टीचा दिवस अन् पावसाचे वातावरण असल्याने कास, ठोसेघर परिसरात मज्जा लुटण्यासाठी गेले होते.

जिह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तेच वातावरण रविवारी सकाळपासून होते. दुपारी बारा वाजता सातारा शहराच्या काही भागात पावसाने सुरुवात केली. रिपरिप पावसाची सुरु झाली होती. त्यामुळे रविवारी बाजारचा दिवस असूनही बाजारपेठेत तुरळक नागरिक दिसत होते. सदाशिव पेठेतही शुकशुकाट जाणवत होता. पावसामुळे अनेक फुटपाथ विक्रेत्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते. गोडोली येथे नेहमीच्या ठिकाणी पाणी साठले होते. जिह्यात खरीप हंगामाची पश्चिम भागात भात काढणी आणि भुईंमूगाची काढणी सुरु आहे. पावसामुळे ही काढणी शेतकऱयांना थांबवावी लागली. तर न काढलेले भात झडण्याची आणि ज्वारी काळी पडण्याची भिती शेतकऱयांमधून व्यक्त होत आहे.

Related Stories

लक्ष्मी टेकडीवरील घरकुलाचे काम अर्धवट

datta jadhav

महाराष्ट्र पोलीस दलावर अविश्वास चुकीचा

Patil_p

पुणे-सातारा टोल रद्द

Archana Banage

कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे सव्वा चार कोटी खर्च

Patil_p

सातारा : मरणानंतरही माणूस माणसाला विचारेना…

datta jadhav

घरातही करा मास्कचा वापर

Archana Banage