Tarun Bharat

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर जेता

प्रतिनिधी / सावंतवाडी:

सौ. सरोज सूर्यकांत पेडणेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त सावंतवाडीतील मुक्ताई ऍकॅडमीने 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील स्पोर्टस कॉम्प्लेक्स हॉलमध्ये स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा सहा गटात खेळविण्यात आली. विजेत्यांसाठी 5,500 रुपये रकमेची 20 बक्षिसे, 5 ट्रॉफी, 15 मेडल्स व प्रशस्तीपत्रे देण्यात आली. स्पर्धेत वैभववाडी, देवगड इत्यादी सर्व तालुक्यातील 58 मुला-मुलींनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे 7-8 वर्षांच्या मुला-मुलींचा स्पर्धेत लक्षणीय सहभाग होता.

बक्षीस वितरण समारंभ आयुर्वेदाचार्य डॉ. संजीव गवंडे, सिधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक सूर्यकांत पेडणेकर, प्रा. अजित व्हनमाने, कणकवलीतील श्री चेस ऍकॅडमीचे श्रीकृष्ण आडेलकर, ऍकॅडमीच्या संचालिका सौ. स्नेहा पेडणेकर, संचालक कौस्तुभ पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

स्पर्धा सहा फेऱयांत खेळविण्यात आली. बाळकृष्ण पेडणेकर सहा गुण घेऊन स्पर्धेचा विजेता ठरला. इतर गटात वरद कामत, तनिष्का आडेलकर, राजेश विरनोडकर, पल्लवी निरवडेकर व मनीष निरवडेकर विजेते ठरले. पल्लवी निरवडेकर यांनी आभार मानले.

विजेते पुढीलप्रमाणे- मुख्य गट ö प्रथम – बाळकृष्ण पेडणेकर, सावंतवाडी, द्वितीय – भावेश कुडतरकर, सावंतवाडी, तृतीय – मिलींद सावंत, सावंतवाडी, चौथा – आयुष राठोड, सावंतवाडी, पाचवा – आर्यन परब, सावंतवाडी.

19 वर्षे मुले – प्रथम – मनिष निरावडेकर, सावंतवाडी, द्वितीय – कौस्तुभ गावडे, सावंतवाडी, तृतीय – आदित्य परब, सावंतवाडी.

19 वर्षे मुली – प्रथम – पल्लवी निरवडेकर, सावंतवाडी, द्वितीय – वैष्णवी तवटे, कणकवली, तृतीय – श्रेया शेळके, वैभववाडी.

15 वर्षे मुले – प्रथम – राजेश विरनोडकर, सावंतवाडी, द्वितीय – आयुष पेडणेकर तृतीय – स्वानंद जोशी.

13 वर्षे मुली – प्रथम – तनिष्का आडेलकर, द्वितीय – भूमी कामत, सावंतवाडी, तृतीय – सौम्या हरमलकर, सावंतवाडी.

11 वर्षे मुले – प्रथम – वरद कामत, सावंतवाडी, द्वितीय – वरद तवटे, तृतीय – अनुज व्हनमान.

Related Stories

रत्नागिरी : कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाला तत्वतः यश

Archana Banage

रत्नागिरी : मुरडव येथील अपघातात दुचाकीस्वार ठार

Archana Banage

Kokan Heavy Rain Update : पालशेत, आरे पुल पाण्याखाली; शृंगारतळी बाजारपेठ जलमय

Abhijeet Khandekar

वैष्णवी जोशीचे सीए परीक्षेत यश

Anuja Kudatarkar

रत्नागिरीत कोरोनाचे आणखीन दोन बळी

Archana Banage

मणेरी पुलाच्या संरक्षक कठडय़ाला जीर्ण फांदीचा आधार

NIKHIL_N