Tarun Bharat

जिल्हा पंचायत भवन बांधण्यासाठी आपले प्राधान्य असेल

Advertisements

आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली ग्वाही

प्रतिनिधी /मडगाव

आपल्या नावेली मतदारसंघात दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी भवन बांधण्याचा प्रस्ताव आहे. आपण आमदार या नात्याने या प्रस्तावाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही नावेलीचे नवनिर्वाचित आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली आहे. काल दक्षिण गोवा जिल्हा पंचायती तर्फे आमदार उल्हास तुयेकर व आमदार ऍथनी वाझ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. तुयेकर बोलत होते.

उल्हास तुयेकर व ऍथनी वाझ हे दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे सदस्य होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोघेही आमदार म्हणून निवडून आल्याने काल त्यांचा दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्काराला प्रतिउत्तर देताना उल्हास तुयेकर यांनी जिल्हा पंचयात भवन प्रकल्पाला आपले प्राधान्य असल्याची ग्वाही दिली. पुढील वर्षभरात जिल्हा पंचायत भवन पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा पंचायतीचे सदस्य म्हणून लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्या सेवेची पोच पावती लोकांनी यावेळी विधानसभा निवडणुकीत दिल्याची प्रतिक्रीया आमदार उल्हास तुयेकर व ऍथनी वाझ यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हा पंचायत सदस्यांच्या ज्या काही समस्या असेल त्या विधानसभेत मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याची हमी या दोघांनी यावेळी दिली.

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर यांनी ऍथनी वाझ तर उपाध्यक्ष खुशाली वेळीप यांनी उल्हास तुयेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व दोघांनाही पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

जिल्हा पंचायतीला अधिकार देण्यासाठी प्रयत्न करा

जिल्हा पंचायतीतून पुढे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर जिल्हा पंचायतीला अधिकार देण्यासाठी कुणी पुढाकार घेत नाही अशी खंत यावेळी उपाध्यक्ष खुशाली वेळीप यांनी व्यक्त केली. यापूर्वी जिल्हा पंचायतीतून आमदार झालेल्यांनी जिल्हा पंचायतीला अधिकार मिळावे यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाही. निदान आत्ता उल्हास तुयेकर व ऍथनी वाझ यांनी तरी जिल्हा पंचायीतला अधिकार मिळावे यासाठी आपले वजन सरकार दरबारी वापरावे अशी विनंती त्यांना केली.

जिल्हा पंचायतीतून आमदार होण्याची परंपरा कायम ठेवली

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीवर निवडून येणारे सदस्य हे भविष्यात आमदार होतात ही परंपरा 2022च्या निवडणुकीत देखील कायम ठेवण्यात आली. उल्हास तुयेकर हे नावेली मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर तर ऍथनी वाझ हे कुठ्ठाळी मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आलेले आहेत. या पूर्वी चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा, क्लाफास डायस हे जिल्हा पंचायतीतून आमदार पदापर्यंत पोचले होते.

Related Stories

राज्यातील पर्यटन क्षेत्राचा विस्तार करणार

Patil_p

पर्वरीत 9 रोजी विधिकार दिन

Omkar B

गांधी मार्केट परिसरात 21 लाख खर्चून विविध कामे राबविणार

Amit Kulkarni

जी.एस. आमोणकर विद्यालयाला नाताळांच्या कॅरल्स गाण्याच्या प्रतियोगीतेत प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस

Amit Kulkarni

भाजपाने मंत्र्याच्या ज्येष्ठता यादीतून आपला खरा चेहरा

Amit Kulkarni

पाणीपुरवठा खात्याच्या अभियंत्याला घेराव

Amit Kulkarni
error: Content is protected !!