Tarun Bharat

जिल्हा परिषदेत बैठकांचा धडाका

प्रतिनिधी / सातारा :

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांची मुदत काही दिवसांनी संपणार आहे. त्यापूर्वी आपल्या हयातीत कामे व्हावीत या उद्देशाने जिल्हा परिषदेत बुधवारी बैठकांचा धडाका सुरु होता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य, बांधकाम, कृषी आणि महिला बालकल्याणच्या सभा पार पडल्या. काही सदस्यांनी या सभांना गैरहजेरी लावली तरीही त्यांची नंतर हजेरी लागणार असल्याचे समजते. या सभांमध्ये मंजूर, मंजूरचा नारा फक्त लावण्यात आला.

जिल्हा परिषदेमध्ये सध्या जास्तीत जास्त आपल्या गटातील कशी होतील यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु आहे. काही दिवसांमध्ये विद्यमान सदस्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे निवडणूका या काही दिवसांनी लागतील त्याची चिंता असल्याने जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांकडून सर्वच समितीच्या बैठका, सभा घेण्याची लगबग सुरु झाली आहे. बुधवारी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याणची सभा सभापती सोनाली पोळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये काही सदस्यांची गैरहजेरी होतीच. त्यामध्ये केवळ औपाचारीक चर्चा झाली. तसेच आरोग्य विभागाची व बांधकाम विभागाची सभा पार पडली. यामध्ये उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल याच्या सुचना दिल्या. बांधकामच्या दोन्ही खातेप्रमुखांना चांगली कामे करा, अशा सुचना दिल्या. कृषी विभागाची सभा सभापती मंगेश धुमाळ यांनी घेतली. त्यांना कृषी अधिकारी डॉ. विजय माईनकर यांनी आढावा दिला. पशुसंवर्धनच्या सभेत पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी लाळ खुरकतचा आढावा दिला. दरम्यान, गुरुवारी स्थायी आणि जलसंधारणची बैठक घेण्यात आली आहे.

Related Stories

जिल्हय़ात राष्ट्रीय लसीकरण दिवस उत्साहात

Patil_p

महाबळेश्वर-तापोळा रस्तावर कार दरीत कोसळली; 3 शिक्षक गंभीर

datta jadhav

कर्णवडीत पुजाऱ्याला बेदम मारहाण

Patil_p

सातारा : पालिकेचा आरोग्य विभाग डाराडुर

Archana Banage

प्रशस्त पार्किंग असतानाही प्रशासकीय इमारतीच्या आवारात वाहने

Patil_p

तडीपार गुन्हेगाराचा युवकावर चाकू हल्ला

Amit Kulkarni