Tarun Bharat

जिल्हा परिषदेसमोर अन्यायकारक जीआरची उद्या होळी..

सांगली / प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षकेतर बांधवांनी मोठ्या संख्येने या जाचक निर्णयाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी व अन्यायकारक जी आर ची होळी करण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेसमोर सोमवार 14 रोजी दुपारी १२ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन सांगली जिल्हा शिक्षकेतर संघटनेमार्फत करण्यात आले आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून ११ डिसेंबर २०२० रोजी काढण्यात आलेल्या चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विरोधात आकृतीबंधाचा शासन निर्णय / जीआर काढण्यात आलेला आहे. या जाचक व अन्यायकारक निर्णयाविरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी पुणे येथे महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत या जाचक व अन्यायकारक शासन निर्णयाला तीव्र विरोध करण्यासाठी तसेच सदर शासन निर्णय रद्द करण्यासाठी शासनाच्या विरोधात आंदोलनाचा एक भाग म्हणून प्रत्येक जिल्हयामध्ये, जिल्हा परिषदेसमोर शासन निर्णयाची  होळी करण्याचे ठरले आहे. 

त्यास अनुसरून १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सांगली यांचे कार्यालयासमोर महामंडळाच्या आदेशानुसार सदर जी.आर. ची होळी करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ सातपुते व कार्यवाह मकरंद कुलकर्णी यांनी दिली.

Related Stories

भारतीय हद्दीत चीननं वसवलेलं गाव आधी उखडा…

datta jadhav

कोडोलीचे तीन भागात विभाजन : बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी

Archana Banage

कोल्हापूर : बँक शिराळ्यात अन् बोगस कर्जे कोल्हापूरात

Archana Banage

सणसवाडी औद्यागिक क्षेत्रातील एका कंपनीला भीषण आग

Tousif Mujawar

मुख्यमंत्र्यांसाठी राज्यपालांकडे ईमेलचा भडिमार

Archana Banage

दिवाळी शिध्याचे वितरण ऑफलाइनच देणार; मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती

Archana Banage