Tarun Bharat

जिल्हा प्रशासनाविरोधात शेतकऱयांची पोलिसात फिर्याद

प्रतिनिधी/ बेळगाव

सांडपाणी प्रकल्पासाठी हलगा येथील शेतकऱयांच्या जमिनी बेकायदेशीररित्या हिसकावून घेण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने सुरू केला आहे. पोलिसांच्या संरक्षणात  जागा कब्जात घेण्यासाठी सोमवारी प्रयत्न करण्यात आले. यावेळी शेतकऱयांवर दडपशाही करण्यात आली. त्यामुळे शेतकऱयांनी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकामध्ये जिल्हा प्रशासनाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

सांडपाणी प्रकल्पासाठी सोमवारी हलगा येथील शेतकऱयांच्या तिबारपिकी जमिनीतील पिकांमध्ये जेसीबी फिरविण्यात आला. त्यामुळे शेतकऱयांतून संताप व्यक्त करण्यात आला. जमिनी देण्यास शेतकऱयांनी यापूर्वीही अनेकवेळा विरोध केला आहे. मागीलवेळीही उभ्या पिकांमध्ये जेसीबी फिरवून जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले होते. न्यायालयाने याबाबत महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तरी देखील त्याचा कोणताच विचार न करता अचानकपणे जमिनी ताब्यात घेण्यासाठी हा घाला घालण्यात आला. सोमवारी शेतकऱयांना अटकही करण्यात आली.

 नुकसान भरपाईही नाकारली

शेतकऱयांना कोणतीही पूर्वसूचना न देता सांडपाणी प्रकल्पासाठी जमीन घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. शेतकऱयांनी त्याला विरोधही केला होता. ही जमीन हिसकावून घेतल्यास अनेक शेतकरी भूमीहीन होणार आहेत. त्यामुळे त्यांनी सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाईही नाकारली होती.

याबाबत अनेकवेळा बैठकाही झाल्या. 5 जानेवारी 2019 रोजी हा प्रकल्प इतरत्र राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. याबाबत बैठकही झाली होती. मात्र अचानकपणे 11 जून 2019 रोजी या जमिनीचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळीही शेतकऱयांनी विरोध केला होता. कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. तरीदेखील जमीन बळकावण्यासाठी जबरदस्ती सुरू झाल्यामुळे शेतकऱयांनी आता पोलीस खात्याकडे धाव घेतली. सुकुमार देवाप्पा हुडेद या शेतकऱयाने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, महापालिका अधिकारी यांच्याविरोधात ही फिर्याद दिली आहे.

Related Stories

बीएड परीक्षा अचानक लांबणीवर; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Amit Kulkarni

शालेय विद्यार्थ्याचा भीषण खून

Omkar B

मनपा निवडणुकीसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल

Amit Kulkarni

कोगनोळीत दहा एकर उसाला आग

Patil_p

अबकारी खात्याच्या कार्यालयासमोर डेनेज चेंबर ओव्हरफ्लो

Amit Kulkarni

निसर्गाची काळजी हे प्रत्येकाचे कर्तव्य

Amit Kulkarni