Tarun Bharat

जिल्हा बँकेची प्रारूप यादी प्रसिद्ध

सातारा / प्रतिनिधी :

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकारण ऐन रंगात येत असताना प्रशासकीय तयारीने सुध्दा गती पकडली आहे. बँकेच्या एकवीस संचालकांना मतदान करणाऱ्या 1963 मतदारांची प्रारूप यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारूप यादीवर हरकती व आक्षेप 13 सप्टेंबर पर्यंत दोन प्रतीत सहनिबंधक कार्यलय कोल्हापूर येथे सादर करावयाचे आहेत.

मतदारांची प्रारूप यादी जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यालय सातारा, सहनिबंधक कार्यालय कोल्हापूर व जिल्हा उपनिबंधक कार्यालय सातारा येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी ही दि. 27 सप्टेंबर रोजी प्रसिध्द होणार असून दाखल होणाऱ्या हरकतींची सुनावणी घेऊन त्यावर दि. 22 सप्टेंबर पर्यंत निर्णय द्यावयाचे आहेत. विभागीय सहनिबंधक प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत.

Related Stories

शहरातील 350 धोकादायक इमारती पालिका उतरवणार

datta jadhav

सातारा : भाजपच्यावतीने राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलच्या प्रदेशाध्यक्षाचा निषेध

Archana Banage

सातारा : गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा रद्द

datta jadhav

केंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षाचा दरीत कोसळून गंभीर

Patil_p

दरोडय़ाच्या गुह्यातील आरोपीला अटक करण्यात वडुजच्या पथकास यश

Patil_p

सी आर पी एफ जवानांचा शॉक लागून मृत्यू: रणसिंगवाडी येथील घटना

Patil_p