Tarun Bharat

जिल्हा बँकेत आजी-माजी मंत्र्यांचा पराभव

प्रतिनिधी / सातारा :

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा 10 जागांचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये सुरुवातीला माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांचा जावली सोसायटी गटातून राष्ट्रवादीचेच ज्ञानदेव रांजणे यांनी एका मताने पराभव केला. त्यांच्या पराभव जिव्हारी लागल्याने समर्थकांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर दगडफेक केली.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी माजी सहकारमंत्री स्व. विलासकाका यांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह उंडाळकर यांचा 11 मतांनी पराभव केला. माण सोसायटी गटातून शेखर गोरे आणि मनोज पोळ यांना समान 36 मते पडली अन् चिठ्ठीवर शेखर गोरे निवडून आले. कोरेगावमधूनही सुनील खत्री आणि जिल्हा परिषदेचे शिवाजीराव महाडिक यांनाही समान 45 मते पडली होती. त्यामध्ये चिठ्ठीवर खत्री हे निवडून आले. विशेष म्हणजे पाटणमध्ये चुरशीने झालेल्या निवडणुकीमध्ये युवा नेते सत्यजितसिंह यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा 14 मतांनी पराभव केला. त्यामुळे देसाईंचा सायरन कुठे वाजलाच नाही. महिला गटात सहकार पॅनेलच्या ऋतुजा राजेश पाटील-वाठारकर, कांचन साळुंखे या विजयी ठरल्या. नागरी बँकामधून रामभाऊ लेंभे हे विजयी ठरले. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जयघोष केला.

जिल्हा बँकेच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता बँकर्सच्या हॉलमध्ये प्रारंभ झाला. 11 टेबलवर मतमोजणी सुरू होती. सकाळी 11 वाजता निकालाचे सर्व चित्र स्पष्ट झाले. निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी निकाल जाहीर केला.

Related Stories

ओबीसी आरक्षणामुळे इच्छूकांच्या आशा पल्लवीत

Archana Banage

दुर्गामातेचे राजधानीसह जिह्यात आगमन

Patil_p

काय करायचे ते ठरले आहे,शिवसेना छत्रपती घराण्याचा सन्मान करेल:संभाजीराजे छत्रपती

Rahul Gadkar

मोबाइल, लॅपटॉपने वाढतोय मायोपिया आजाराचा धोका

Patil_p

दगडखाणीतील तो खून नरबळीतून झाल्याचा संशय

Patil_p

गणेश मंडळाकडून मूर्तीचे बुकिंगच नाही

Patil_p