Tarun Bharat

जिल्हा बँकेला 149 कोटी 22 लाख करपूर्व नफा

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची पत्रकार परिषदेत माहिती

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2021-22 या आर्थिक वर्षाखेर 149 कोटी 22 लाख रुपये करपूर्व नफा झाला असून 107 कोटी 36 लाख इतका करोत्तर नफा झाला आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता बँक जिह्यातील शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्वखर्चातून 3 कोटींचे व्हेंटीलेटर व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आर्थिक वर्षाखेर झालेल्या नफ्याबाबत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष सुनिल माने, आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, नितीन पाटील, प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे यांची उपस्थिती होती.

अधिक माहिती देताना शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, 8577 कोटी 56 लाख बँकेच्या ठेवी असून 5562 कोटी 76 लाख कर्ज वितरीत केले आहे. बँकेने 14140 कोटी 32 लाख एवढा संमिश्र व्यवसाय केला आहे. बँकेच्या स्वनिधीत 67 कोटी इतकी भरीव वाढ झाली असून 670 कोटी 7 लाख एवढा बँकेचा स्वनिधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सरकारी कर्जरोखे आणि बँकांमध्ये 3975 कोटी 69 लाख एवढी सुरक्षित गुंतवणूक केली आहे. बँकेने या आर्थिक वर्षात 23 कोटी 63 लाख आयकर भरलेला आहे.

शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज

बँकेचे ठोबळ अनुत्पादक कर्ज 9 कोटी 49 लाख असून एकूण कर्जाचे हे प्रमाण फक्त 17 टक्के आहे. ढोबळ एनपीडीएचे प्रमाण देशातील सर्व बँकांपेक्षा कमी आहे. शेतकरी सभासदांसाठी बँकेने केलेल्या तरतूदी आणि योजनांची माहिती देताना ते म्हणाले, रुपये एक ते तीन लाख पर्यंतच्या पीक कर्जावर 2 टक्के व्याज परतावा देण्यासाठी 6 कोटी 50 लाखांची तरतूद केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱया कर्जदार सभासदांच्या अल्पमुदत कर्जावर गत 10 वर्षापासून बँक व्याज परतावा देत आहे. शेतकरी सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी दिलेल्या शैक्षणिक कर्जावर व्याज परताव्यासाठी 1 कोटी 1 लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे शिक्षण कालावधीत शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज प्राप्त होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच व्यवसाय अडचणीत आल्याने अशा परिस्थितीमध्ये कृषी पर्यटन व्यवसायास दिलासा देण्यासाठी बँकेने कृषी पर्यटन कर्जदार सभासदांना 4 टक्के व्याज परताव्यासाठी 28 लाखांची तरतूद केली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात बँक नियमित कर्जफेड करणाऱया शेतकऱयांसाठी शेतकरी मेडिक्लेम ग्रुप पॉलिसी सुरु करीत आहे. या योजनेत बँकेचे कर्जदार शेतकरी व त्यांची पत्नी वा कुटूंबातील एका सदस्यास गंभीर अथवा विशिष्ट आजारासाठी एक लाख रुपये उपलब्ध होतील. या योजनेत कॅशलेस उपचार केले जातील. साखर कारखान्यांना मध्यम मुदत कर्जावर 50 टक्के रुपये एक कोटी व दीर्घ मुदत कर्जावर 1 टक्के प्रमाणे 1 कोटी व्याज प्रोत्साहन दिले आहे. बँक पातळीवर शंभर टक्के कर्जवसुली करणाऱया संस्थांना 29,500 प्रतिसंस्थांप्रमाणे 953 संस्थांसाठी 2 कोटी 81 लाख रुपयांची तरतूद केली आहे. संस्था पातळीवर शंभर टक्के कर्जवसुली करणाऱया संस्थांना रुपये 16 हजार प्रती संस्था प्रमाणे वसुली गौरव निधीसाठी 25 लाख रुपयांची तरतूद केली आहे.

बँक कर्मचाऱयांना 15 टक्के सानुग्रह अनुदानासाठी 8 कोटी 32 लाख आणि एका बक्षिसपात्रासाठी 4 कोटी 62 लाखांची तरतूद केली आहे. विकाससंस्था गोडावून आणि इमारत बांधकाम व्याज परताव्यासाठी 64 लाख 70 हजार रुपयांची तरतूद केली आहे.

Related Stories

जिल्हय़ात राष्ट्रीय लसीकरण दिवस उत्साहात

Patil_p

सातारा : मत्यापुर- अतीत दरम्यान उरमोडी नदीपात्रात वाळूमाफियांचा धुमाकूळ

Archana Banage

सातारा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा

Archana Banage

राऊत चवन्नी छाप, तर ठाकरे महिलेला घाबरले: रवी राणा

Rahul Gadkar

शिंगणापूर : चारशे फूट दरीत कार कोसळून माय-लेकाचा अंत

datta jadhav

हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना आदरांजली

Tousif Mujawar