Tarun Bharat

जिल्हा बँकेसाठी अकरा मतदान केंद्रे

एका मतदान केंद्रावर 8 कर्मचारी अन् दोन पोलीस

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी 21 रोजी मतदान होत आहे. 21 जागांपैकी 11 जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. आता 9 मतदार संघातून 10 जागासाठी ही निवडणूक होत आहे. याकरता जिह्यातील 11 ठिकाणी मतदान केंद्रे असून प्रत्येक मतदान केंद्रावर 8 कर्मचारी व दोन पोलीस कर्मचारी अशी तयारी करण्यात आली आहे. जे संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. त्या ठिकाणी ज्यादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली. दरम्यान, 10 जागांसाठी होत असलेल्या या निवडणूकीसाठी प्रत्येक मतदार संघात चांगलीच प्रचाराची रंगत आली आहे.

जिह्यात सध्या जिल्हा बॅकेचे वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दि. 21 रोजी होणाऱया मतदानाची तयारी केली आहे. त्याकरता मतदान केंद्रे कशी असावीत या जागांची पाहणी करुन तेथे मतदानाची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, मतदानांसाठी लागणाऱया मतपत्रिक, शिक्यासाठी शाई व इतर साहित्यांची तयारी करण्यात आली आहे. तसेच 11 तालुक्यात 11 ठिकाणी मतदान केंद्रे असून मतदान केंद्रावर मतदान केंद्राधिकारी एक व त्यांना सहकार्य करणारे 7 जण असे आठ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन पोलीस कर्मचाऱयांचा बंदोबस्त असणार आहे. तसेच संवेदनशील केंद्रे म्हणून पाटण, माण, खटाव, कराड या चार केंद्रामध्ये पोलीस बंदोबस्त ज्यादा ठेवण्यात येणार आहे, असेही निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी माहिती दिली.

मतदारांची दिवाळीनंतर दिवाळी जिल्हा बँकेसाठी 1964 मतदार आहेत. जेथे सोसायटी गटातून निवडणूक लागली आहे. तेथील मतदारांना 5 तर जिथे बिनविरोध झाली आाहे तेथील मतदारांना चार मते देण्याचा अधिकार आहे. जे आपलेच आहेत त्यांना उमेदवार विचारत नाहीत परंतु विरोधी गटातील मतदार आहे त्यास लालूच दाखवून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामध्ये काही मतदारांनी दिवाळीनंतर दिवाळी केली. काहीजण सहलीवर गेले तर काहींनी चांगल्या चांगल्या वस्तू घेतल्याची चर्चा रंगत आहे. एकूणच ज्या विकास सेवा सोसायटीने ठराव दिला त्या सोसायटीमधील सर्वसामान्य शेतकऱयांच्या मताचा विचार पैसे घेणाऱया मतदाराने निश्चित केला नाही, पाच वर्षातून एकदाच दिवाळी आली असल्याने याचा फायदा उठवला जात आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

Related Stories

अमित शहांचा मुंबई दौरा; ‘मिशन मुंबई’ महापालिकेचा करणार शुभारंभ

Archana Banage

पुण्यात पुढील 7 दिवसांसाठी मिनी लॉकडाऊन! दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी

Tousif Mujawar

तभा इफेक्ट : साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्यांची होतेय ॲन्टिजन टेस्ट

datta jadhav

अंगावर छप्पर पडल्याने वृद्धाचा मृत्यू

datta jadhav

नाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही बसचा बर्निंग थरार, जीवितहानी नाही

Archana Banage

‘ही’ आहेत कोरोनाची नवी लक्षणे

datta jadhav