Tarun Bharat

जिल्हा बँक पुरस्कारांचे उद्या वितरण

अध्यक्ष सतेश सावंत यांची माहिती

प्रतिनिधी / ओरोस:

सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ऑगस्ट 2020 मध्ये जाहीर केलेल्या विविध पुरस्कारांचे वितरण 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे दुपारी 1 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संचालक आत्माराम ओटवणेकर आणि आर. टी मर्गज उपस्थित होते.

सहकारमहषी शिवराम भाऊ जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पहिले अध्यक्ष, माजी आमदार शिक्षण महषी केशवराव राणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार पिटर फ्रान्सिस डान्टस यांना जाहीर झाला आहे. जिल्हा बँक माजी अध्यक्ष प्रा. डी. बी. ढोलम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार जयदीप सुरेश पाटील यांना जाहीर झाला आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा कृषीमित्र पुरस्कार श्रीधर पुरुषोत्तम ओगले यांना जाहीर झाला आहे. तर, राज्याचे माजी कृषीमंत्री पी. के. तथा बाळासाहेब सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार डॉ. राजेशकुमार प्रकाशचंद्र गुप्ता यांना जाहीर झाला आहे.

सहकार क्षेत्रात काम करणाऱया संस्था, सहकारी संस्था पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी व शेतकरी यांना काम करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी चार वर्षे जिल्हा बँकेमार्फत सन्मानित केले जात आहे. या पुरस्कार प्राप्त व्यक्तींची निवड त्या-त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची समिती नेमून केली गेली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.

Related Stories

तीन नेपाळी कामगारांचा मृत्यू

Patil_p

आचरा ग्रामपंचायत अंतर्गत विविध स्पर्धांचे निकाल जाहीर

Anuja Kudatarkar

आंतरराष्ट्रीय योगदिन युट्युब व फेसबुकच्या माध्यमातून साजरा केला जाणार

Anuja Kudatarkar

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण निलंबित

NIKHIL_N

निरवडे येथे साटम महाराज पुण्यतिथीनिमित्त ९ ते ११ मार्च रोजी भरगच्च कार्यक्रम

Anuja Kudatarkar

जि. प.च्या 300 शाळा होणार आदर्श

NIKHIL_N