Tarun Bharat

जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे खेळाडू युनिव्हर्सिटी ब्लू

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटना व भूषण बॅडमिंटन अकादमीच्या बॅडमिंटनपटूंनी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी ब्लूचा बहुमान पटकाविला.

महालिंगपूर येथे घेण्यात आलेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठ सिंगलझोन आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा व पुरूष व महिलांची निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये 32 पुरूष व 16 महिला संघानी भाग घेतला होता. या स्पर्धेत महिलांचा अंतिम सामना केएलई लिंगराज महाविद्यालय व केएलई आरएलएस महाविद्यालय यांच्यात झाला. पहिल्या एकेरीत नम्रताला रिहाकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला. पण दुहेरीत नम्रता व पद्मश्री या जोडीने रिहा व श्रुती यांचा 2-0 असा पराभव केला. दुसऱया एकेरीत पद्मश्रीने श्रुतीचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.

पुरूषांचा अंतिम सामना जैन वि. आरपीडी यांच्यात झाला. पहिल्या एकेरीत सुजयने अभिषेकचा 2-1 असा पराभव केला. दुहेरीत सुजय व राहुल या जोडीने अभिषेक व शिवानंद या जोडीचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धांच्या निरीक्षणानंतर महिलांच्या युनिव्हर्सिटी ब्लू संघाची निवड करण्यात आली. त्यामध्ये रिहा मंतेरो, नम्रता पाटील, पद्मश्री तिन्हेकर, आरती बजंत्री, विद्या काडगी तर स्वाती शिरगुर, सुदर्शनी मगदूम या दोघींची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

पुरूष गटात सचिन राठोड, एन. हॅलिक्सीन, राहुल देवरमनी, बसवराज होळीगुड्डी, संजय नंदण्णावर, महमद गाजी मुजावर यांची निवड झाले. राहुल रेवणकर, गणेश राठोड हे राखीवमध्ये आहेत. या बॅडमिंटनपटूंना बॅडमिंटन प्रशिक्षक भूषण अणवेकर यांचे मार्गदर्शन, बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव अशोक पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Related Stories

कर्नाटक : विद्यार्थ्यांची शिक्षकांना मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Archana Banage

अपघातातील मयताच्या कुटुंबाला 1 कोटी 60 लाख देण्याचे आदेश

Patil_p

कर्लेत जिजाऊ महिला मंडळाचा स्नेहमेळावा

Amit Kulkarni

लक्ष्मी मार्केटमधील गाळे वादाच्या भोवऱयात

Omkar B

शाकंभरी पौर्णिमा साधेपणाने साजरी

Amit Kulkarni

अवघे शहर लखलखले

Amit Kulkarni