Tarun Bharat

जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील पार्किंग निश्चित

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात अखेर दुचाकी चारचाकी वाहनांसाठी पार्किंग निश्चित करण्यात आले असून रविवारी वाहनांसाठी पांढरे पट्टे आखण्यात आले आहेत. पार्किंग निश्चित केल्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळण्यात मदत झाली असून त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हा रुग्णालयात जिह्यातून रोज उपचार करून घेण्यासाठी शेकडो रुग्ण व उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक येत असतात. त्यातच रुग्णालयात अतिदक्षता विभागात कोरोना आयसोलेशन वार्ड असल्यामुळे रुग्णालयात नियमित मोठय़ा प्रमाणावर रुग्णांसह वैद्यकीय अधिकारी नर्सेस यांचा राबता असतो.

रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पार्किंग निश्चित करण्यात आले होते. मात्र ते केवळ जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, कर्मचारी यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्यामुळे अन्य लोकांना दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला होता. ठिकठिकाणी लोक वेडीवाकडी वाहने लावत असल्यामुळे बऱयाचदा वाहनचालक आणि सुरक्षारक्षकांमध्ये खडाजंगी होत होती.

याबाबत जवळपास माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या सूचनेवरून सुरक्षा रक्षक आनंदा घाडगे यांनी रविवारी जिल्हा रुग्णालयातील आवारात रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येणारे नागरिक यांच्यासाठी पार्किंग निश्चित करत पांढरे पट्टे आखून पार्किंग निश्चित केले. त्यामुळे दुचाकी चारचाकी वाहन चालकांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.

Related Stories

किल्ले अजिंक्यताऱ्यावर अभूतपूर्व सोहळ्यात स्वाभिमान दिन साजरा

datta jadhav

शंभूतीर्थ स्मारक उभारणीसाठी कराड तालुक्याचा सहभाग घेणार

Patil_p

खरा मुख्यमंत्री कोण हेच कळेना

Kalyani Amanagi

सातारा शहर पोलीस ठाण्याची डीबी नव्या दमाची फौज

Patil_p

उच्च न्यायालयाने मंदाकिनी खडसेंची याचिका फेटाळली

datta jadhav

सातारा : भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टीतील रिकामी घरे हटविण्यास सुरुवात

datta jadhav
error: Content is protected !!