Tarun Bharat

जिल्हा रूग्णालयातील कोरानाग्रस्तांसाठी रोबोटची मदत

रत्नागिरीत तरूणाचा अभिनव उपक्रम

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कारोना रूग्णांपासून विषाणूंचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी आता रोबोटची मदत घेण्यात येणार आह़े रत्नागिरीमधील संजय वैश्यंपायल या तरूणाने कोरोना रूग्णासांठी रोबोट तयार केला असून जिल्हा रूग्णालयात या रोबोटचा वापर देखील करण्यात येत आह़े त्यामुळे रूग्णालयातील कर्मचाऱयांना होणारा कारोनाचा धोका काही प्रमाणात कमी होणार आह़े

कोराना रूग्णांवर उपचार करणाऱया डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांना देखील कारोनाची लागण झाल्याचे सर्वत्र दिसून येत आह़े त्यामुळे रूग्णांना गोळ्या-औषधे, पाणी, जेवण यासाठी प्रत्यक्ष कर्मचाऱयांचा वापर न करत रोबोटचा वापर करण्यावर भर दिला जात आह़े रत्नागिरी जिह्यात देखील कारोना रूग्णांची संख्या 42 वर पोहचली असून वैद्यकीय कर्मचाऱयांना कोरोनाचा धोका वाढला आह़े

अशा परिस्थितीत रत्नागिरीमधील संजय वैशमपायल यांनी रोबोटची निर्मीती केली आह़े हा रोबोट 22 किलो वजन वाहून नेवू शकतो, तसेच 15 लोकांचे जेवण पाणी आदींची वाहतूक करण्याची क्षमता यामध्ये आह़े केवळ पावणे दोन फुट रूंद असल्याने रूग्णांच्या दोन खाटांमधील अंतरामध्ये सहजतेने या रोबोटला फिरता येत़े या रोबोटमध्ये स्पिकरची व्यवस्था करण्यात आली असून पेशंट व डॉक्टर यांच्यामध्ये संवाद साधण्यासही मदत होत आह़े

या रोबोटचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे ऑपरेट करण्यास अत्यंत सोपे आह़े सर्वसामान्य माणूस त्याला सहजतेने ऑपरेट करू शकत़ो त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱयांना या रोबोटचा फायदा होणार आह़े जगभरात अशा प्रकारे कोरोना रूग्णांवरील उपचारादरम्यान रोबोटचा वापर करण्यात येत आह़े रत्नागिरी जिह्यात देखील आता रोबोट वापरण्यात येत वैद्यकीय कर्मचाऱयांना उपचारादरम्यान मदत होणार आह़े

Related Stories

‘पांढरी चिप्पी’ला ‘राज्य कांदळवन वृक्ष’ म्हणून घोषित

NIKHIL_N

यूएसमध्ये अंगावर काटे येणारी स्थिती

NIKHIL_N

मालवण दूरध्वनी कार्यालयात अधिकारी घेतात स्वत:ला कोंडून

NIKHIL_N

एमपीएससी परीक्षा पुढे जात असल्याने लांजातील तरूणाची आत्महत्या

Patil_p

समर्थ प्लाझा महिला ग्रुपकडून दिविजा वृद्धाश्रमाला मदत

NIKHIL_N

आंबोली घाटात ट्रक कोसळून चालकाचा मृत्यू

NIKHIL_N
error: Content is protected !!