Tarun Bharat

जिल्हा रूग्णालयात मातांसाठी स्वतंत्र 20 बेडचा वॉर्ड

प्रतिनिधी/ सातारा

 प्रसूतीसाठी दाखल झालेल्या व प्रसुती झालेल्या अशा सर्व महिलांची संख्या अनेकदा वाढल्याने जिल्हा रूग्णालयातील वॉर्डमधील उपलब्ध बेड अपुरे पडतात. महिलांना जमिनीवर बेड टाकून व्यवस्था करावी लागते. यामुळे महिलांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हा शासकीय रूग्णालयातून अतिदक्षता विभागात असणाऱया नवजात शिशुंच्या मातांसाठी स्वतंत्र 20 बेडचा वॉर्ड, कावीळ झालेल्या बालकांच्या उपचारासाठी फोटोथेरपी मशिन, चार वॉर्मरचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे.

जिल्हा रूग्णालयातील मोफत सोयी-सुविधा मिळत असल्याने दुर्गम भागातील रूग्ण येथे उपचारासाठी येत असतात. परंतु काही विभागात अपुऱया सोयी-सुविधा असल्याने अनेक वेळा रूग्णांची गैरसोय होत आहे. अशीच गैरसोय प्रसुती वॉर्ड मध्ये होत आहे. प्रसुतीसाठी आलेल्या व प्रसुती झालेल्या महिलांची संख्या जास्त असल्याने त्यांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जमिनीवर बेड करून झोपवण्यात येते. ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा रूग्णालयाने स्वतंत्र 20 बेडचा वॉर्ड तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या वॉर्डसाठी आवश्यक असलेल्या इमारत व अन्य साहित्यांच्या खर्चासह हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच कावीळ झालेल्या नवजात बालकांसाठी आवश्यक असलेल्या चार फोटोथेरपी मशिनच्या मागणीचाही या प्रस्तावात समावेश आहे. मोठया अतिदक्षता विभागाची गरज जिल्हा रूग्णालयात सध्या अस्तित्वात असलेल्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागाची (एनआयसीयू) बेडची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव अनेकांना कर्ज काढून का होईना खाजगी रूग्णालयातील खर्चाचा भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे एनआयसीयू विभागातील वॉर्मरची संख्या किमान दुप्पट करण्याची गरज आहे. त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी पावले उचलणे आवश्यक आहे.

Related Stories

गोसावी बरोबरच्या फोटोमुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ

Archana Banage

दादर राड्याप्रकरणी सरवणकरांवर गुन्हा दाखल, अरविंद सावंत यांची माहिती

datta jadhav

सकाळी गर्दी तर दुपारी शुकशुकाट

Patil_p

अकरा दिवसानंतर बाधितांचा आकडा 900 च्या पुढे

datta jadhav

शैक्षणिक फी साठी पालकांची अडवणूक करू नये-उदयनराजे

Amit Kulkarni

महाराष्ट्रात 5,123 रुग्णांना डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.64%

Tousif Mujawar