Tarun Bharat

जिल्हा विकास आराखड्यासाठी उस्मानाबादला 285 कोटींचा निधी मंजूर

Advertisements

प्रतिनिधी / उस्मानाबाद

जिल्हा विकास आराखड्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याला 285 कोटींचा विकास निधी खेचून आणण्यात आपल्याला यश मिळाले आहे. असे जि.प. अध्यक्षा मा अस्मिताताई कांबळे यांनी स्पष्ट केलं आहे.

या बाबत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण) सन 2021- 2022 चा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी मा.ना.श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा मंत्री, वित व नियोजन महाराष्ट्र राज्य, यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे राज्यस्तरीय बैठक, आज दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना.शंकरराव गडाख, जि.प.अध्यक्ष, मा अस्मिताताई कांबळे, जिल्हयाचे खासदार श्री ओमराजे निंबाळकर, व जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

सदर बैठकीत, जिल्हा विकास आराखड्यासाठी 285 कोटी रुपयांचा निधी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी खेचून आणण्यात आपल्याला यश आलेले आहे, असे प्रतिपादन, जि.प. अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी केले आहे. उस्मानाबाद जिल्हयाच्या सन 2021-22 या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन आणि विकास आराखड्यात तब्बल 285 कोटी रुपये खेचून आणण्यात यश मिळाले असून यात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा यासाठी तसेच 21 योजनांसाठी विशेष निधी आणि उस्मानाबाद येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणासाठी व लोहारा येथील नवीन विश्रामगृह बांधकामासाठी रुपये 8 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी दिली आहे.

Related Stories

सोलापूर शहरात 32 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

एक जानेवारी पासून सर्व टोल नाक्यावर फास्ट टॅग अनिवार्य

Abhijeet Shinde

सोलापूर : दार उघड उद्धवा दार उघड

Abhijeet Shinde

सोलापूर : बार्शीतील भाजी मंडई चालू करण्याबरोबर सुविधा देण्याची मागणी

Abhijeet Shinde

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोट्यावधी युवक बेकार

Abhijeet Shinde

कोरोनाच्या उपाययोजनेसाठी विठोबा धावला, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटीची मदत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!