Tarun Bharat

जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले बांधकाम विभागाला पत्र

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

तत्कालीन सिव्हील सर्जन यांनी 3 महिने होत आले तरी अद्यापही शासकीय निवासस्थान सोडले नाही. इतकेच नव्हे तर या निवासस्थानाची चावी कोणत्याही नातेवाईकांना पर्यटन वारीसाठी दिली जाते. त्यामुळे ही चावी बांधकाम विभागाने ताब्यात घेवून योग्य ती कार्यवाही करावी किंवा कुलूप तोडून निवासस्थानाचा ताबा घ्यावा, असे पत्र बांधकाम विभागाला सिव्हील सर्जन डॉ. संघमित्रा फुले यांनी दिले आहे.

डॉ. बोल्डे यांची बदली होवून 2 महिने होवून गेले तरी अद्यापही शासकीय निवासस्थानची चावी सिव्हील प्रशासनाकडे जमा केलेली नाही. मुळात बदली होवून गेल्यापासून एकदाही रत्नागिरीत आलेले नाही, मात्र अद्यापही निवासस्थान का सोडले नाही, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ही चावी कोणत्याही नातेवाईकांना दिली जाते. त्यामुळे पर्यटनासाठी निवासस्थानाचा वापर केला जातो का, अशी चर्चा केली जात आहे. त्यामुळे हे निवासस्थान ताब्यात घ्यावा अन्यथा कुलूप तोडावे, असे पत्र बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. याविषयी जिल्हाधिकारी यांच्याशी सिव्हील सर्जन डॉ. संघमित्रा फुले यांनी चर्चा केली असता वेळ पडल्यास कुलूप तोडून निवासस्थान ताब्यात घेवूया, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

खेड रेल्वे स्थानकानजीक तीन कावळे मृतावस्थेत

Patil_p

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वेंगुर्ले नगरातील विकास कामांसाठी वेंगुर्ले राष्ट्रवादीकडून निधीची मागणी

Ganeshprasad Gogate

मुख्यमंत्री करणार आज जलविद्यृत प्रकल्प पाहणी

Omkar B

कणकवलीतील बहुचर्चित नाल्याची दुरुस्ती अखेर सुरू

NIKHIL_N

विसर्जनासाठी गणेशमूर्तींची कचऱयागाडय़ातून वाहतूक

Patil_p

सावंतवाडी बाजारपेठेतील दुर्गंधी बाबत मनसेने वेधले मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!