Tarun Bharat

जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 31 ऑक्टो. 2021, स. 11.00

● शनिवारी रात्री अहवालात 36 बाधित
● एकूण 3 हजार 295 जणांची तपासणी
● पॉझिटिव्हिटी दर 1.09 टक्के
● चार तालुके राहू लागले निरंक
● संकट टळतेय पण काळजी आवश्‍यकच

सातारा / प्रतिनिधी :

ऑक्‍टोबरच्या 11 तारखेपासून कोरोना बाधित वाढीचा आलेख 100 च्या खाली घसरला. तेव्हापासून सलग एकविसाव्या दिवशी बाधित वाढ शंभरच्या खाली राहिली असून, यामध्ये आठ वेळा ती 50 च्या खाली राहिलेली आहे. गत तीन-चार दिवसात सलगपणे बाधित वाढीचा आलेख 50 च्या खाली राहिलेला असून अनेक तालुके शून्यावर आलेले आहेत. तेथे एक देखील नवीन रुग्ण वाढ होत नसल्याने जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे सुरू झालेली आहे. मात्र त्यातच दीपावलीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत अलोट गर्दी होत आहे. यामध्ये अद्याप तरी नियम पाळण्याची गरज असून संकट टळत चाललेले आहे. पण काही महिने तरी काळजी घ्यावीच लागणार आहे.

पॉझिटिव्हिटी दर 1.09 टक्क्यावर

गेला आठवड्यापासून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर एक टक्केच्या दरम्यान स्थिर आहे. गत चार दिवसात तो एक टक्क्यांच्या खाली घसरल्याचा दिलासा मिळाला असून, शनिवारी रात्रीच्या अहवालात तो पून्हा 1.09 नऊ टक्के एवढा राहिलेला आहे. मात्र पॉझिटिव्हिटी दरी खाली घसरत असल्याने रुग्ण वाढीचा आलेख मंदावलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, तपासण्यांचा वेगही कमी झालेला आहे.

शनिवारी अहवालात 36 बाधित

शुक्रवारच्या अहवालात फक्त 32 बाधित समोर आल्याने आठ ते नऊ महिन्यांतील नीचांकी बाधित वाढ नोंद झालेली होती. शनिवारी रात्रीच्या अहवालात थोडीशी वाढ झालेली असून वाढ 50 च्या खालीच राहिलेले आहे. पण यामध्ये 36 नागरिकांचा अहवाल बाधित आलेला आहे. एकूण 3 हजार 295 जणांची तपासणी करण्यात आल्यानंतर ही वाढ समोर आल्याने पॉझिटिव्हिटी दर पुन्हा एक टक्के वर आलेला आहे.

खंडाळा, खटावात पहिल्यांदा वाढ शून्यावर

एकूण कोरोना स्थितीमध्ये जिल्ह्यात पहिल्यांदा कराड तालुका हॉटस्पॉट ठरला होता व त्यानंतर सातारा तालुका जिल्ह्यातील नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा हॉटस्पॉट ठरला. मात्र सद्यस्थितीत सातारा, कराडसह सर्व तालुक्यांमध्ये बाधित वाढीचा खाली घसरलेला आलेख जिल्ह्याला दिलासा देत आहे. यामध्ये जावली, पाटण, महाबळेश्वर अनेक वेळा निरंक राहिलेले असून ते कोरोनामुक्तही झालेले आहेत. मात्र शुक्रवारच्या अहवालात पहिल्यांदाच खंडाळा व खटाव तालुक्यात एक देखील नवीन बाधित समोर न आल्याने व फलटण तालुका एकांकी संख्येवर आल्याने हॉटस्पॉट ठरलेले हे तालुके सावरले आहेत.

पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 20 लाखांनजीक

जिल्ह्यात मंदावलेली बाधीत वाढ आणि दुसरीकडे लसीकरणाचा वेग वाढलेला असून पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या वीस लाखांनजीक आहे. पहिला व दुसरा डोस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या 28 लाख 28 हजार 467 एवढी दिलासादायक झालेली असून यामध्ये पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 19 लाख 63 हजार 532 एवढी आहे तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या आठ लाख 64 हजार 935 एवढी झालेली आहे.

शनिवारी जिल्ह्यात
बाधित 32
मृत्यू 3
मुक्त 21

शनिवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने 22,27,667
एकूण बाधित 2,51,088
एकूण मुक्त.2,43,449
मृत्यू 6,428
उपचार्थ 562

Related Stories

सातारा : शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी खावली येथील जागेला तत्वतः मान्यता

Archana Banage

सहा तालुक्यात बाधितवाढ दहाच्या आत

datta jadhav

Satara Political:अभिनेते तेजपाल वाघ यांना लागलेत राजकीय डोहाळे

Abhijeet Khandekar

जरंडेश्वर मारुती मंदिरासाठी भक्तगण उतरणार रस्त्यावर

Patil_p

कोयनेसह सर्व धरणांमध्ये चांगला पाणीसाठा

datta jadhav

सोमवारच्या संपात श्रमिक मुक्ती दल सहभागी होणार

datta jadhav