Tarun Bharat

जिल्ह्यातील निम्मे शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत

खरीपासाठी 257 शेतकरी पात्र, रब्बीसाठी केवळ 97.24 हेक्टरचाच विमा

कोल्हापूर / विठ्ठल बिरंजे

रब्बी हंगामातील पीकं काढणीला आली तरी अद्याप खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने पात्र शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. कोरोनामुळे आधीच शेती अडचणीत आली असताना पिक विमा कंपनीने चालढकल सुरु केल्याने त्या शेतकऱयांन दादा मागायची कुणाकडे असा प्रश्न शेतकऱयांसमोर उभा राहिला आहे. या प्रकारमुळे रब्बी हंगामासाठी विमा उतरवण्याकडे शेतकऱयानी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. यंदाच्या रब्बी हंगामात जेमतेम 104 हेक्टर क्षेत्रातील पिकांना शेतकऱयांनी विमा संरक्षण घेतले आहे.

नैसर्गिक आपत्तीत होणाऱया नुकसानीपासून शेतकऱयाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरु केली. राज्य सरकारनेस्ही केंद्राच्या बरोबरीने या योजनेतील वाटा उचलला. कोल्हापूर जिल्हÎात रिलायन्स कंपनीला पिक विम्याचा ठेका दिला असून कंपनीने 850 रुपये हप्ता निश्चित केला आहे. विमा हप्तविमा संरक्षण मिळवण्यासाठी शेतकऱयांकडून हेक्टरी 250 रुपये भरुन घेतले जाताता तर उर्वरित 600 रुपये केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी 50 टक्के रक्कम विमा कंपनीला अनुदान देते.

गतवर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे जिल्हÎातील शेतीची मोठी हाणी झाली. खरीप हंगाम वाया गेला. हातातोंडालाक आलेली पीक पाण्याखाली गेल्याने नष्ट झाली. मात्र पिक विमा नसल्याने शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तात्कालीन फडणवीस सरकाने कर्जमाफी देवून शेतकऱयांना दिलासा दिला. यातून बोध घेवून यंदाच्या खरीप हंगामात तब्बल 2772 शेतकऱयांनी विमा संरक्षण घेतले होते. या हंगामात नुसकसान झाले असल्यास अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकक्षकांनी केले होते. या आवाहनानंतर 840 शेतकऱयांनी नुकसानीची पूर्व सूचना दिली होती. कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱयांनी केलेल्या सर्व्हेक्षणात 680 शेतकरी पात्र ठरवून त्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. अंतिम तपासणीत 257 शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आले.

लागतात. त्यांना पिकांच्या नुकसानीच्या प्रमाणात 11. 14 लाख रुपये नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली. 134 शेतकऱ्यांना 9.49 नुकसान भरपाई देण्यात आलीही मात्र उर्ववरित शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 123 शेतकरी अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना 1.65 लाख रुपये मिळू शकतात खरीप हंगाम संपला, रब्बी अंतिम टप्प्यात आला तरही विमा कंपनीने लक्ष दिले नाही. कंपनीकडून अडचणीच्यावेळी विमा रक्कम मिळणार नसेल तर काय उपयोग असा सवाल हे शेतकरी विचारत आहेत. मिळणारी विमा रक्कम लहान असली तरी अडचणीतील शेतकऱयांच्या दृष्टीने ही डोंगरा एवढा आधार त्यांना आहे. कंपनीच्या अधिकाऱयांनी विमा भरपाई देताना दुजाभाव करुन शेतकऱयांच्यात भेदभाव करु नये अशी अपेक्षा शेतकऱयांची आहे.

कृषी विभागाचे प्रयत्न व्यर्थ

जास्ती जास्त शेतकऱयांना विमा कवच मिळाले पाहिजे यासाठी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून खरीपासह रब्बी हंगामात जारेदार जनजागृती केली. शेतकऱयांचे प्रबोधन केले. शेतकऱयांचा सहभाग वाढवण्यासाठी जमेल त्या पद्धतीने प्रयत्न केले. तरीही रब्बी हंगामात केवळ702 शेतकऱयांनी 97. 24 हेक्टरचा विमा उतरवला आहे. तर फळबाग लागवड केलेल्या शेतकऱयांकडूनही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. 167 शेतकऱयांनी 104.48 हेक्टरचा विमा उतरवला आहे.

व्यापक प्रमाणात जनजागृती अगवश्यक

जिल्ह्यात साडे पाच लाख शेतकरी आहेत. 1 लाख 58 हजार 930 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. याचा विचार केला तर विमा संरक्षण घेणारे शेतकऱयांचे प्रमाण नगन्यच आहे. हवामानात दिवसेंदिवस बदल होत आहे. ऋतुमानातही बदल घडत आहेत. त्यामुळे शेती बेभरवशाची झाली आहे. यातून अधिक नुकसान होण्याचा धोका आहे. संभाव्य नुकसानीपासून सावरण्यासाठी पीक विमा हा एकमेव आधार शेतकऱयांना आहे. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देवू

शेतकऱ्यांना विमा रक्कम तातडीने मिळवून देण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. झालेली नुकसान भरपाई कंपनीकडून मिळवून देऊच. विमा कंपनीचे आमचा संपर्क सुरु आहे. शेतकऱ्यांचे पैस बुडणार नाहीत. – ज्ञानदेव वाकुरे,जिल्हा कृषी अधिक्षक, कोल्हापूर

Related Stories

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्यावर

Archana Banage

ऑनलाईन सूर्यनमस्कार चॅलेंजला देशातून मोठा प्रतिसाद

Archana Banage

वाढीव वीज बिलांची त्रिसदस्यीय समितीतर्फे चौकशी करा

Archana Banage

कोल्हापूर : सिरसंगी येथे गवा विहिरीत पडला

Archana Banage

पालेश्वर धरणाच्या सांडव्यातून पडणाऱ्या पाण्यात युवक बुडाला

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेत नवे रूग्ण प्रथमच पाचशेच्याखाली, मृत्यू 13

Archana Banage