Tarun Bharat

जिल्ह्यातील प्रभारी मंत्री बदलणार

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी जिल्ह्यातील प्रभारी मंत्री बदलाचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या उच्च कमांडने विद्यमान जिल्हा प्रभारी मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्याऐवजी अन्य जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसार हा अंतर्गत बदल केला जात आहे. राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. प्रभारी अनेक मंत्री केवळ त्यांच्या मूळ जिल्ह्यापुरते मर्यादीत असल्याने राज्यात अशी अनेक जिल्हे आहेत ज्यात पक्षाची संघटना बळकट होत नाही. हा दोष दूर करण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची बदली केली जात आहे.

मध्यम उद्योग मंत्री जगदीश शेट्टर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, सुरेश कुमार, जे.सी. मधुसस्वामी, के.एस. ईश्वरप्पा, आर.शंकर, नारायण गौडा, व्ही. सोमाण्णा आणि अबकारी मंत्री के. गोपालय्या यांना नव्या जिल्ह्याचा कार्यभार देण्यात येणार आहे.

अनेक जिल्ह्यांत दोनपेक्षा जास्त मंत्री असल्याने अनेक वाद निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे मंत्र्यांना त्यांच्या गृह जिल्ह्यातून काढून इतर जिल्ह्यांचा प्रभारी करण्यात येत आहे. जिल्हा प्रभारी मंत्र्यांसमवेत स्थानिक आमदारांचा समन्वय नसल्यामुळे अनेक जिल्ह्यात हा बदल केला जात आहे.

Related Stories

आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करा; अन्यथा…

Amit Kulkarni

बेंगळूर: आजपासून दिवसभर मेट्रो सेवा

Abhijeet Shinde

कर्नाटकातील ‘हे’ चार खासदार घेणार केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

Abhijeet Shinde

कर्नाटक: ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय

Abhijeet Shinde

कर्नाटकात १ फेब्रुवारीपासून ९ वी, १०, पीयूसीचे पूर्ण दिवस वर्ग

Abhijeet Shinde

कर्नाटकात कोरोना चाचणीची गती वाढली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!