Tarun Bharat

जिल्ह्यात आतापर्यंत 720 कोटींचा जीएसटी महसूल जमा

Advertisements

सांगली / प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 720 कोटी रुपयाचा जीएसटी महसूल जमा झाला आहे अशी माहिती केंद्रिय जीएसटी कार्यालय, सांगली यांच्याकडून देण्यात आली. मागील वर्षी एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या 10 महिन्यात जीएसटीचे कलेक्शन रू 628 कोटी इतके होते. आता एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 चा महसूल हा 720 कोटी इतका झाला. मागील वर्षी पेक्षा आता दहा महिन्यात जीएसटी महसुलात सुमारे 92 कोटीची म्हणजेच 15 टक्के वाढ झाली आहे.

जानेवारी 2020 पासून सुरु झालेला जीएसटी वाढीचा ट्रेंड कोरोनाच्या दुसऱ्या / तिसऱ्या लाटेमुळे जून 2021 व डिसेंबर 2021 चा अपवाद वगळता कायम आहे. आता वाढीचा दरात वृद्धी होऊन जिल्ह्याच्या जानेवारी 2022 च्या जीएसटी संकलनामध्ये मागील जानेवारी 2021 च्या तुलनेत वाढ आहे. मागील वर्षी जानेवारी 2021 या महिन्यात जीएसटीचे महसूल 70 कोटी इतके होते. तर आता जानेवारी 2022 चा महसूल हा 81 कोटी इतकाच नोंदला गेला. जीएसटी महसुलात सुमारे 11 कोटीची म्हणजेच 15 टक्के वृद्धी झाली आहे.

Related Stories

सांगली आयर्विन ब्रिज जवळ पाणी पातळीत सहा इंचाने घट

Archana Banage

सांगली : कवठेपिरान येथे युवकाचा खून

Archana Banage

उगाच तोंड उघडायला लावू नका, हवेतून खाली या…; मिटकरींचा केसरकरांना इशारा

Archana Banage

फिफ्टी फिफ्टी चलो गुवाहटी, विधिमंडळात विरोधकांचे बिस्किट पुडे चर्चेत

Abhijeet Khandekar

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे अशक्य : देवेंद्र फडणवीस

Archana Banage

Sangli; पावसाचा जोर ओसरला,आयर्विनची पातळी 23 फुटावर

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!