Tarun Bharat

जिल्ह्यात उदयापासून शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला

Advertisements

ओटवणे / प्रतिनिधी:

        ठाणे येथील तिमिरातून तेजाकडे’ या उपक्रमाचे आयोजक आणि स्थानिक आयोजक यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी १७  ते २२ सप्टेंबर पर्यंत नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेचे करण्यात आले आहे.
            सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात २५ ऐतिहासिक नि:शुल्क व्याख्याने घेतल्यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी विविध शासकीय पदांवर अधिकारी तसेच कर्मचारी स्वरूपात घडावेत यासाठी या सामाजिक उपक्रमाची सुरुवात होत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडवण्यासाठी “तिमिरातुनी तेजाकडे” उपक्रम विद्यार्थ्यांच्या पसंतीचा उपक्रम ठरला आहे. मुंबईत वास्तव्यास असणारे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार हे विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शक तसेच मुख्य अतिथी स्वरूपात संबोधित करणार आहेत.
          व्याख्यानमालेचे वेळापत्रक खालील प्रमाणे:- शुक्रवार 17 सप्टेंबर रोजी मोचेमाड ग्रामपंचायत सभागृह, दुपारी 3.30 वाजता, शनिवार 18 सप्टेंबर रोजी वेंगुर्ले हायस्कूल सकाळी 10.00 वाजता, रविवार 19 सप्टेंबर रोजी मालवण आंबडोस  ग्रामपंचायत सभागृह सकाळी 10.00 वाजता तर सायंकाळी 04.00 वाजता मालवण देऊळवाडा नगरसेविका सौ. पूजा करलकर यांचे निवासस्थान, सोमवार 20 सप्टेंबर रोजी श्री भगवती हायस्कूल तसेच जुनियर कॉलेज मुणगे, देवगड- सकाळी 10.00 वाजता तर दुपारी 02.00 वाजता देवगड श्री. स ह केळकर महाविद्यालय, मंगळवार 21 सप्टेंबर रोजी कुंदे ग्रामपंचायत सभागृह कुडाळ सकाळी 9.30 वाजता त्यानंतर  दुपारी 12.30 वाजता कै. सौ. गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे, बुधवार 22 सप्टेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फोंडाघाट सकाळी 9.00 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक व शासकीय नोकरीच्या मार्फत उज्वल भविष्याच्या अनुषंगाने गरजुवंत विद्यार्थी व पालक वर्ग यांनी आयोजक व समन्वयक यांच्या 9969657820 या मोबाइल वर संपर्कसाधून आपले स्थान व नामांकन निश्चित करावे आणि सदर व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन सत्यवान रेडकर यांनी केले आहे.

Related Stories

तक्रारीची चौकशी तीन वर्षांनंतरही पुढे सरकेना

NIKHIL_N

27 जानेवारीनंतर शाळेची घंटा खणाणार

Patil_p

महामार्ग समस्यांबाबत बांधकाममंत्र्यांचे लक्ष वेधणार

NIKHIL_N

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरी प्रवेशाची आज शताब्दी!

Patil_p

रत्नागिरी : दापोली-खेड मार्गावर अपघात, विद्यापीठ कर्मचारी ठार

Abhijeet Shinde

जिल्हय़ात आजपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी

Patil_p
error: Content is protected !!