Tarun Bharat

जिल्ह्यात नव्याने ४२ कोरोना बाधित, रामवाडी येथील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यु

सातारा/प्रतिनिधी

काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 34, प्रवास करुन आलेले 3, सारी 4, आरोग्य सेवक 1 असे एकूण 42 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 24 पुरुष व 18 महिलांचा समावेश आहे. जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये कराड तालुक्यातील तारुख येथील 60 वर्षीय महिला व 40 वर्षीय पुरुष, कोरीवळे येथील 8 वर्षीय बालक, नडशी येथील 33 वर्षीय महिला, हजारमाची येथील 35 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 12 वर्षीय युवक व 36 वर्षीय महिला, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 32 वर्षीय महिला डॉक्टर. पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 18 वर्षीय युवती
माण तालुक्यातील कोलेवाडी दहिवडी येथील 36 वर्षीय पुरुष, खडकी येथील 75,42 वर्षीय महिला व 17,15,22,53 वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील आदंरुड येथील 52 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील करहर येथील 52 वर्षीय् महिला, 7 वर्षीय बालक, रामवाडी येथील 15,19,70,26,23 वर्षीय महिला व 12,48,58,60,27 वर्षीय पुरुष, मुनावळे येथील 42 वर्षीय पुरुष
कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्द येथील 31 वर्षीय पुरुष, जिहे येथील 19, 47 वर्षीय पुरुष व 62, 60 वर्षीय महिला, दुर्गळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, सातारा येथील भंडारी प्लाझा, गोडोली येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 58 वर्षीय महिला, यादव गोपाळ पेठ येथील 27 वर्षीय महिला, प्रतापगंज पेठ येथील 46 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 75 वर्षीय पुरुष
खटाव तालुक्यातील पडळ येथील 55 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


एका बाधिताचा मृत्यु
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील मुंबई येथून प्रवास करुन आलेला जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या रुग्णास मधुमेह व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

घेतलेले एकुण नमुने
13972
एकूण बाधित 1188
घरी सोडण्यात आलेले 757
मृत्यु 49
उपचारार्थ रुग्ण 382

Related Stories

कोरोनामुळे अक्षय तृतीया मुहूर्तावर लाखोंची उलाढाल ठप्प

Archana Banage

महेश मांजरेकरांना अटकेपासून दिलासा

datta jadhav

”थोडी जरी शिल्लक असेल तर केंद्राने देशाची जाहीर माफी मागावी”

Archana Banage

तृणमूल कार्यकर्त्यांची सीबीआय कार्यालयावर दगडफेक

Archana Banage

Satara : केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांनी केले सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जेवण

Abhijeet Khandekar

पोलीस अधिक्षकांच्या 93 वर्षीय आजीची कोरोनावर मात

Patil_p