Tarun Bharat

जिल्ह्यात बाधितांची वाटचाल हजाराकडे

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात सोमवारी पहाटे इचलकरंजीतील एक रूग्ण पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सायंकाळपर्यत सारे काही शांत होते. रात्री १० वाजता १५ पॉझिटिव्ह रूग्ण दिसून आले. त्यामुळे जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णांची ९८४ वर पोहोचली आहे. दोघे जण कोरोनामुक्त झाल्याने कोरानामुक्तांची संख्या ७४८ झाली आहे.

परजिल्हय़ांतून जिल्हय़ात येणाऱयांची संख्या सोमवारीही वाढली, त्यामुळे सीपीआरमध्ये गर्दी होती. सोमवारी रात्री १९ पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. त्यामध्ये हातकणंगलेतील २, आजरा तालुक्यातील ५, चंदगड तालुक्यातील ३ गडहिंग्लज तालुक्यातील २, चंदगड तालुक्यातील ३, इचलकरंजी ३, भुदरगड तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथील कलानगरातील २० वर्षीय पुरूष, ११ वर्षांचा मुलगा, चंदूर येथील मुंगळे मळय़ातील ३५ वर्षीय पुरूष, आजरा तालुक्यातील भादवण येथील २५ आणि २३ वर्षांच्या महिला तर भादवणवाडी येथील २६ आणि २१ वर्षांचे तरूण, ८५ वर्षांचा वृद्ध यांचा समावेश आहे. गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ येथील २५ वर्षीय महिला, कुमरी येथील २३ वर्षीय पुरूष, भुदरगड तालुक्यातील मुदाळतिठ्ठा येथील ३१ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.रात्री १० वाजता आलेले ३ पॉझिटिव्ह रूग्ण चंदगड तालुक्यातील शिनोळी येथील आहेत. यामध्ये ३८ वर्षीय महिला, ५२ आणि ६२ वर्षांच्या पुरूषाचा समावेश आहे. पाच जण कोरोनामुक्त झाल्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या ७४८ झाल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.

दरम्यान, दिवसभरात परजिल्हय़ातून जिल्हय़ात आलेल्या १ हजार ७४८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६५३ जणांचे स्वॅब घेतले. तसेच संशयित ४२४ जणांना आयसोलेटेड केले आहे. रात्रीपर्यत आलेल्या ४९१ स्वॅब रिपोर्टमधील १४ पॉझिटिव्ह आले असून ४६३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.  सोमवारी रात्रीपर्यंत जिह्यात आजअखेर ९८४ पॉझिटिव्हपैकी ७४८ जणांना डिस्चार्ज दिला आहे. आजअखेर जिल्ह्यात २१६ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.

आज अखेर तालुका, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी
आजरा ९२, भुदरगड ७७, चंदगड १११, गडहिंग्लज ११२, गगनबावडा ७, हातकणंगले १८, कागल ५८, करवीर ३०, पन्हाळा २९, राधानगरी ७३, शाहूवाडी १८७, शिरोळ १२, नगरपालिका क्षेत्र ९२, महापालिका क्षेत्र ५९ असे ९५७ आणि पुणे २, सोलापूर ३, मुंबई ४, नाशिक १, कर्नाटक ७, आंध्र प्रदेश १ आणि सातारा २ आणि अन्य २० मिळून ९७७ रुग्णसंख्या आहे. जिह्यातील ९८४ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ७४८ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. १३ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या रूग्णांची संख्या २१६ इतकी आहे.

Related Stories

कोझीकोडीतील ‘योद्धा’ चिपळूणचा, गावाशी नाळ आजही कायम

Archana Banage

सांगलीत ‘ऑनलाईन टिचींग’ चा फंडा

Archana Banage

शिरोळ पंचायत समिती सभापतींवरअविश्वास ठरावाच्या हालचाली सुरु

Archana Banage

संदीप देशपांडेंनी ठाकरे सरकारला दिलं आव्हानं, म्हणाले, …तर राजकारण सोडून देईन

Archana Banage

राहूल पाटील यांना राजीव गांधी जिल्हा पंचायत पुरस्कार

Archana Banage

मंगळवार वाईकरांसाठी ठरला आनंददायी

Patil_p
error: Content is protected !!