Tarun Bharat

जिल्ह्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला

अचूक बातमी “तरुण भारत” ची, रविवार, 9 मे, सकाळी 11.00

● शनिवारी अहवालात 2,334 बाधित ● पॉझिटिव्हिटी रेट वाढताच 40.64 ● कडक लॉकडाऊन उद्या शेवटचा दिवस ● नेमके कोणत्या तालुक्यात किती ? ● सविस्तर अहवाल काही वेळातच ● वाढ रोखण्यासाठी उपाय सुरूच ● कडक भूमिका घ्याव्या लागतील ● अनेक गावात सुरू जनता कर्फ्यू

सातारा / प्रतिनिधी :

एप्रिल महिन्याच्या एंडिंगला 30 रोजी एकूण वर्षातील 2,494 एवढी उच्चांकी बाधित वाढ नोंदवली गेली. 1 मे त्यादिवशी थोडीशी कमी पण 2,383 उच्चांकी वाढीने मे महिन्याचा आरंभ झाला आहे. तर गेल्या रविवारी रात्रीच्या अहवालात बाधित वाढीने नवा उच्चांक नोंदवला. तब्बल 2,502 जणांचे अहवाल बाधित आल्याने आता स्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. तेव्हापासून सातत्याने बाधित वाढीचा हा उच्चांक मोडला गेला नसला तरी दोन हजारांच्या पटीत सुरू असलेले बाधित वाढ जिल्हावासीयांना छळत आहे. शनिवारी रात्री च्या अहवालात देखील 2,334 एवढ्या संख्येने बाधित समोर आले आहेत. बाधित वाढ आणि वाढता मृत्युदर रोखायचा कसा यावर आता काम करावे लागणार आहे. दरम्यान, ही बातमी करत असतानाच 10.45 ला प्रभारी जिल्हादंडाधिकारी यांनी 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचा आदेश पारित केलेला आहे. 

लॉकडाऊनमध्ये फक्त हे सुरु राहणार

याच बातमीत आता लॉकडाऊन कडक करावा लागणार की काय ? अशी शक्यता व्यक्त केली होती.  त्याच दरम्यान आत्ताच  प्रभारी जिल्हा दंडाधिकारी यांनी दि. 15 मेपर्यंत लोक डाऊन वाढवण्यात आल्याचा आदेश पारित केलेला आहे. त्यामुळे दूध व मेडिकल सुविधा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. भाजीपाला, किराणा दुकाने, मटण, चिकन यांना सकाळी 7 ते 11 घरपोच सेवेसाठी परवानगी आहे.  मेडिकल दुकाने, लॅब, वैद्यकीय सुविधा मागील आदेशानुसार सुरु राहणार आहेत. नवीन आदेशानुसार वाईन शॉप, बिअर, परमीटरुममधून दुपारी 12 ते 5 या वेळेतच घरपोच सेवा देण्यास परवानगी राहणार असून बँका, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, काही खासगी आस्थापना या पूर्वी असलेल्या वेळेनुसार सुरु राहणार असल्याचे प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.  

लॉकडाऊन केल्यानंतरच उच्चांकी वाढ

 जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीत दुसऱ्या लाटेमुळे सगळे घाबरले होते मात्र ती आलीच नाही बाधीत वाढ मंदावत असताना मार्च महिन्यापासून पुन्हा ती वाढू लागली एप्रिल महिन्यात पुन्हा चांगला जोर धरला आणि मे महिन्यात बाधीत वाढ आणि मृत्यु दरात उच्चांक पाहावयास मिळाले त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पॅनिक झालेले आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन केल्यानंतरच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाधित वाढीचा वेग राहिला आहे. 

कडक लॉकडाऊन उद्या संपतोय

 बाधित वाढीमुळे जिल्ह्यात नागरिकांना बेड मिळणेही दुरापास्त झाले. त्यामुळे प्रशासनाने दि. 10 रोजी पर्यंत पूर्ण संचारबंदी म्हणजेच कडक लॉकडाऊन पुकारला. या कालावधीत विविध ठिकाणी हॉस्पिटल्स सुरू करण्यात आली बेडची संख्याही वाढवण्यात आली. आज दहा तारखेपर्यंत पुकारलेला लॉकडाऊन उद्या रात्री बारा वाजता संपेल. मात्र तरी जिल्ह्यातील बागेत वाढ वाढता मृत्यू दर थांबलेला नाही हे नेमके कशामुळे आणि त्यावर काय उपाय करायचे याचा प्रशासनाला आरोग्य विभागाला विचार करावा लागणार आहे.

कोविड हॉस्पिटलबाहेर अद्यापही रांगा

मोठ्या संख्येने होणारी बाधित वाढ थांबवायची कशी याबाबत आता सर्व जिल्हावासीयांसह प्रशासनाला देखील हातात हात घालून काम करावे लागणार आहे.  हॉस्पिटल्स बाहेर उपचार घेण्यासाठी बाधित रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या रांगा लागत आहेत. तिथे असलेल्या गर्दीच्या चेहऱ्यावर हताश भावना दिसून येत आहे.  कारण बेड मिळत नाहीत. व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेड नसल्याने अनेकजण ते मिळण्याची वाट पाहत आहेत. गंभीर स्थितीतील रुग्णांना घेऊन नातेवाईक बेड शोधताहेत. अशा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. 

कडक लॉकडाऊनची गरज 

अनलॉकनंतर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये बेशिस्तपणा वाढला होता. ग्रामपंचायत निवडणुका, लग्नकार्य, आंदोलने आणि इतर ठिकाणी गर्दी केली जात होती. मास्कचा वापरही कमी झाला होता मात्र त्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधित वाढ होत नव्हती. आता लॉकडाऊन सुरू असून लोक नियम पाळून घरात बसलेले असताना होणारी बाधित वाढ आणि तीही मोठ्या संख्येने ही अनाकलनीय आहे. मात्र तरीदेखील ज्या पद्धतीने जिल्ह्यात आज स्थिती निर्माण झाली आहे ती सावरायची असेल तर आणखी पंधरा दिवस पूर्ण संचारबंदी लागू करावी लागण्याची शक्यता आहे यामध्ये फक्त वैद्यकीय सुविधा, मेडिकल लॅब सुरू राहतील बाकी सर्व व्यवहार बंद ठेवून बाधित वाढ रोखावी लागणार आहे.

शनिवारी अहवालात 2,334 बाधित

 मागील दोन-तीन दिवसातील उच्चांकी आकडेवारी नंतर शनिवारी रात्रीच्या अहवालात 2,334 जणांचा अहवाल बाधित आला आहे. या अहवालानुसार एकूण  6 हजार  66 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2,334 जणांचा अहवाल बाधित आलेला असून पॉझिटिव्हिटी रेट 40.64 असा आहे. 

बाधित वाढ रोखण्याचे आव्हान कायम

 जिल्ह्यात 2 हजारांच्या संख्येने सुरू असलेली बाधित वाढ चिंताजनक ठरू लागली आहे. बाधित वाढीतील उच्चांक, कोरोना बळीच्या आकड्यांमध्ये उच्चांक परिस्थितीचे गांभीर्य वाढवू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला सावरण्यासाठी उपाय योजना वाढवून संसर्ग रोखण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा हे निश्चितच. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लोक स्वतः पुढाकार घेऊन संसर्ग वाढ रोखण्यासाठी प्रयत्न करू लागलेत त्यासाठी अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू, पूर्ण संचारबंदी लोक स्वयंस्फूर्तीने पाळू लागले आहेत. तरीदेखील वाढणारे बाधितांचे आकडे बुचकळ्यात टाकत आहेत.

शनिवारी जिल्ह्यात बाधित 2,379, मृत 44, मुक्त 1,936
शनिवारपर्यंत एकूण नमुने 5,92,238, एकूण बाधित 1,20,804, घरी सोडण्यात आलेले 96,070, मृत्यू 2,828, उपचारार्थ रुग्ण 21,847

Related Stories

सातारा : फाळकूट भाईच्या दारू गुत्यावर पोलिसांचा छापा

Archana Banage

सदरबझारात पावसात रस्त्याचे काम सुरू

Patil_p

‘शिक्षक’ ही शोध मोहिमेवर

Patil_p

निर्बंध शिथिल झाल्याने शिवजयंतीचा उत्साह वाढला

datta jadhav

शहरातील 350 धोकादायक इमारती पालिका उतरवणार

datta jadhav

दारुसाठी पैसे न दिल्याने एकावर कोयत्याने वार

Patil_p