Tarun Bharat

जिल्ह्यात 1875 नवे रुग्ण वाढले

अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार, 21 मे, सकाळी 11.00

● चाचण्या पुन्हा 5 हजारांवर ●पॉझिटिव्हिटी रेट 32.38 वर ●जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा पहिला बळी ●गृहविलिगीकरणाचे नियम आणखी कडक हवेत ● सातारा,कराड,फलटणला संचारबंदीचे उल्लंघन वाढले ● मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न आवश्यक

सातारा / प्रतिनिधी : 

जिल्ह्यात कोरोनाच्या घटत्या रूग्णसंख्येने दिलासा मिळत असला तरी गत वर्षीच्या तुलनेत रूग्णसंख्येचा आकडा अजुनही जास्तच आहे. सातारा,कराड, फलटण तालुक्यांतील रूग्णवाढ रोखायची कशी असा प्रश्न प्रशासनासमोर असून कराडात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण रस्त्यावर फिरताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. गृहविलिगरणातील पॉझिटिव्ह रूग्णांच्या नियमावलीत प्रचंड ढिलाई आल्याने असे कितीतरी पॉझिटिव्ह रूग्ण गर्दीत रस्त्यावर वावरत असतील याचा प्रशासनाला थांगपत्ताही नसेल. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने गृहविलिगीकरणाचे नियम आणखी कडक करण्याची गरज आहे. दरम्यान गेल्या 24 तासात 5 हजार 790 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून त्यामधे जिल्ह्यात  1875 रूग्णांची  नव्याने वाढ झाली आहे. या वाढीनंतर पॉझिटिव्हिटी रेट 32.38 वर आला आहे. 

बेड वाढवा, पण योग्य नियोजन हवे

कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात अजुनही कमी होताना दिसत नाही. आकडे कमी जास्त होत असले तरी कितीतरी रूग्णांची बेडसाठी धावाधाव सुरूच आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात 450 बेड वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सातार,कराडला प्रत्येकी 150 बेड, फलटणला 100 बेड तर वाईला 50 बेड वाढणार आहेत. बेडची संख्या लवकर वाढवण्याची गरज असून त्याचे योग्य नियोजन व त्यावर प्रशासकीय नियंत्रण गरजेचे आहे. अन्यथा रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सध्या प्रचंड फरपट होत असून बेड न मिळाल्याने मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्याही वाढती आहे. 

रूग्णवाढ रोखण्यासाठी पुढील 15 दिवस महत्त्वाचे

जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या काहीप्रमाणात कमी होत असली तरी पुढचे पंधरा दिवस जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहेत. या पंधरा दिवसात काटेकोर नियम पाळले तर रूग्णवाढीचा आकडा आणखी कमी येईल अशी शक्यता जिल्हा आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे. या चालू आठवड्यात बुधवारचा 2692 रूग्णांचा आकडा वगळता रूग्णवाढ कमालीची घसरली आहे. हा घसरता आलेख कायम ठेवण्यासाठी पुढील पंधरा दिवस जबाबदारीने नियम पाळण्याची गरज आहे. 

रेमडेसिवीरनंतर आता ऍम्फोटेरिसिनसाठी धावाधाव

जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजाराचा गुरूवारी पहिला बळी गेला. स्टेरॉईडसच्या अतिवापराने कोरोना रूग्णांमधे हा आजार बळावत आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी ऍम्फोटेरिसिनच्या इंजेक्शनचा वापर होत आहे. इंजेक्शनची किंमत 7 हजार 862 रूपये आहे. सातारा जिल्ह्यातही म्युकर मायकोसिसचे रूग्ण आढळले असून ते वाढू नयेत यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र तरीही रेमडिसिवीरनंतर आता या आजारावरील इंजेक्शनसाठी रूग्णांचे किंवा नातेवाईकांची धावपळ सुरू झाली आहे. त्यांचे हाल होऊ नये यासाठी आत्तापासूनच प्रशासनाने योग्य तो संदेश व नियोजन जिल्हावासियांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. 

गुरुवारी जिल्ह्यात एकूण बाधित 1875, एकूण मुक्त 1828, एकूण बळी 41

गुरुवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमुने -659295, एकूण बाधित – 144,936, घरी सोडलेले -120646, मृत्यू -3328, उपचारार्थ रुग्ण-22,852                                             

Related Stories

आज घट बसणार

Patil_p

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे

Patil_p

तब्बल दोन हजार शिक्षकांच्या निवड श्रेणीस अंतिम मंजुरी

Amit Kulkarni

Satara: पालकमंत्र्यांचा फोटो असलेला शिवतीर्थावरील बॅनर हटवला

Archana Banage

झोपडपट्टी सुरक्षा दलाकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा

Patil_p

बाधित वाढ 300 च्या आत

datta jadhav
error: Content is protected !!